शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

Election: निवडणुकीत डिपॉझिट जप्त होणं म्हणजे काय? कधी होतं डिपॉझिट जप्त, वाचवण्यासाठी लागतात किती मतं? जाणून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 16:31 IST

Assembly Election 2022 Result: पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर होणार आहे. त्यानंतर या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं. हे तर आपलं डिपॉझिटही वाचवू शकले नाहीत, अशी विधाने ऐकू येतील. मात्र डिपॉझिट जप्त होणं म्हणजे काय, हे तुम्हाला माहिती आहे का?

नवी दिल्ली - पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर होणार आहे. त्यानंतर या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं. हे तर आपलं डिपॉझिटही वाचवू शकले नाहीत, अशी विधाने ऐकू येतील. मात्र डिपॉझिट जप्त होणं म्हणजे काय, हे तुम्हाला माहिती आहे का? कुठलीही निवडणूक लढण्यासाठी उमेदवाराला एक ठराविक रक्कम निवडणूक आयोगाकडे जमा करावी लागते. त्याच रकमेला डिपॉझिट म्हटले जाते. जर कुठल्याही उमेदवाराला ठराविक मते मिळाली नाही, तर त्यांची अनामत रक्कम म्हणजे डिपॉझिट जप्त केली जातात.

डिपॉझिटची रक्कम प्रत्येक निवडणुकीसाठी वेगवेगळी असते. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपर्यंत उमेदवाराला अनामत रक्कम जमा करावी लागते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या डिपॉझिटच्या रकमेचा उल्लेख हा रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल्स अॅक्ट १९५१ मध्ये आहे. तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या अनामत रकमेचा उल्लेख प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट इलेक्शन अॅक्ट १९५२ मध्ये करण्यात आला आहे.

लोकसभा आणि विधानसबा निवडणुकीमध्ये सामान आणि एससी-एसटी वर्गातील उमेदवारांसाठी  वेगवेगळी अनामत रक्कम निश्चित केलेली आहे. तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्व वर्गातील उमेदवारांसाठीत सारखीच अनामत रक्कम निश्चित केलेली असते.लोकसभा निवडणुकीत सामान्य वर्गातील उमेदवाराला २५ हजार तर एससी-एसटी वर्गातील उमेदवारांना १२ हजार ५०० रुपये डिपॉझिट रक्कम जमा करावी लागते. तर विधानसभा निवडणुकीती सामान्य वर्गातील उमेदवारांना १० हजार आणि एससीएसटी वर्गातील उमेदवारांनी ५ हजार रुपये जमा करावे लागतात. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्व वर्गातील उमेदवारांना १५ हजार रुपये डिपॉझिट जमा करावी लागते.  

डिपॉझिट कधी जप्त होते निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार जर कुठल्याही उमेदवाराला त्या जागेवर पडलेल्या एकूण मतांपैकी १/६ म्हणजेच १६.६६ टक्के मते मिळाली नाहीत तर त्यांची अनामत रक्कम जप्त केली जाते. - जर कुठल्याही जागेवर १ लाख मते पडली आणि तिथे पाच उमेदवारांना १६ हजार ६६६ पेक्षा कमी मते मिळाती तर त्या सर्वांची अनामत रक्कम जप्त केली जाते. - हा फॉर्म्युला राष्ट्रपी आणि उपराष्ट्रपती निवडणुकीमध्येही लागू होतो. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना आपले डिपॉझिट वाचवण्यासाठी १/६ मते मिळवण्याची आवश्यकता असते. 

कुठल्या परिस्थितीत डिपॉझिट परत केलं जातं-उमेदवाराला जेव्हा एकूण मतदानाच्या १/६ टक्क्यांपेक्षा मते मिळतात. तेव्हा त्यांची डिपॉझिट रक्कम परत केली जाते.- जिंकणाऱ्या उमेदवरालाही त्याची डिपॉझिट रक्कम परत दिली जाते. त्याला १/६ टक्क्यांहून कमी मते मिळाली तरी ही रक्कम परत केली जाते.  - मतदान सुरू होणयापूर्वी जर कुठल्याही उमेदवाराचा मृत्यू झाला तर त्याच्या नातेवाईकांना अनामत रक्कम परत केली जाते. - उमेदवाराचं नामांकन रद्द झाल्यावर किंवा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यावर डिपॉझिट रक्कम परत केली जाते. 

टॅग्स :ElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMONEYपैसा