शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 17:36 IST

ओवैसी म्हणाले, "जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने (पाकिस्तान) केले. इराण भारताच्या अधिक जवळ आहे, तरीही भारत मध्यस्थीची भूमिका का बजावू शकला नाही, याचे दुःख वाटते."

अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांचा युद्धविराम झाला आहे. यानंतर, भारतात राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी यासंदर्भात मोदी सरकारवर थेट निशाणा साधला आहे. ओवैसी म्हणाले, "जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने (पाकिस्तान) केले. इराण भारताच्या अधिक जवळ आहे, तरीही भारत मध्यस्थीची भूमिका का बजावू शकला नाही, याचे दुःख वाटते." भाजप केवळ '३ तासांचा चित्रपट' दाखवून जनतेला खुश करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

काश्मीरमधील नेत्यांच्या संमिश्र प्रतिक्रियाइराण आणि अमेरिका यांच्यात ४० दिवसांच्या संघर्षानंतर झालेल्या या सीजफायरवर जम्मू-काश्मीरमधील नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली. नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते फारुख अब्दुल्ला यांनी या कराराचे स्वागत केले. अब्दुल्ला श्रीनगरमध्ये म्हटले, "युद्धाने काहीही साध्य होत नाही, चर्चा हाच एकमेव मार्ग आहे. दोन्ही देश चर्चेच्या टेबलावर आले, याबद्दल मी देवाचे आभार मानतो." काय म्हणाले मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला?दुसरीकडे, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मात्र या युद्धाच्या फलनिष्पत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी #UnjustWar असे लिहीत 'X' वर पोस्ट करताना म्हटले की, "या करारामुळे 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' पुन्हा खुला झाला. जो युद्धापूर्वीही सर्वांसाठी खुलाच होता. ४० दिवसांच्या युद्धानंतर अमेरिकेला नेमके काय साध्य झाले?" ओमर अब्दुल्ला यांनी असे म्हणत अमेरिकेच्या धोरणात्मक अपयशावर बोट ठेवले आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Owaisi slams Modi government: Pakistan did what India should have.

Web Summary : Owaisi criticized Modi's government, stating Pakistan mediated between Iran and the US, a role India should have played. Farooq Abdullah welcomed the ceasefire, while Omar Abdullah questioned its outcome, highlighting US policy failure.
टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAmericaअमेरिकाWarयुद्धIranइराण