शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट आहे तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 06:59 IST

Central Vista project News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी नव्या संसद भवनाच्या बांधकामासाठी भूमिपूजन झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी नव्या संसद भवनाच्या बांधकामासाठी भूमिपूजन झाले. दोन दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने नवे संसद भवन ज्या प्रकल्पांतर्गत उभारले जाणार आहे त्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर सुनावणी करताना केंद्र सरकारला तूर्तास केवळ भूमिपूजनासाठीच परवानगी दिली. या प्रकल्पासंदर्भात काही याचिका दाखल झाल्या आहेत. त्यात सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत करण्यात येणाऱ्या इमारतींचे पाडकाम, झाडांची तोडणी यावर आक्षेप घेण्यात आले आहेत. यासंदर्भात आधी केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल करावे मगच प्रकल्पाच्या बांधकामाला हात घालावा, असे सर्वोच्च न्यायालयाने सुनावले. या सर्व पार्श्वभूमीवर  सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा घेतलेला आढावा..प्रकल्पाची गरज का भासली?  सद्य:स्थितीतील संसद भवन तसेच विविध सरकारी खात्यांची कार्यालये, मंत्र्यांची दालने, मंत्रालय, पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती यांची निवासस्थाने हे सर्व अपुरे पडत आहे या सगळ्याचे बांधकाम १९२७ मध्ये एडविन ल्युटेन्स आणि हर्बर्ट बेकर या ब्रिटिश स्थापत्यकारांनी केले आहे. त्यामुळे या परिसराला ल्युटेन्स दिल्ली असे संबोधले जाते काळानुरूप सध्याची बांधकामे जीर्ण आणि अपुरी आहेत. त्यामुळे नव्या संसद भवनासह संपूर्ण परिसराचे नव्याने बांधकाम करण्याचे ठरले ५ ऑगस्ट २०१९ रोजी संसदेत सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या उभारणीला मंजुरी देण्यात आलीनवीन काय? सेंट्रल व्हिस्टा  प्रकल्पांतर्गत सध्याचे नॉर्थ आणि साऊथ ब्लॉक यांचे रूपांतर संग्रहालयात केले जाईल. उपराष्ट्रपतींचे सध्याचे निवासस्थान पाडले जाईल. नवीन संसद भवनात भव्य असा कॉन्स्टिट्यूशन हॉल (राज्यघटना सभागृह) उभारला जाईल. कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये घटनेची मूळ प्रत ठेवली जाईल. संसद भवनाच्या आवारात सर्व मंत्र्यांची नवीन कार्यालये असतील. पंतप्रधान आणि उपराष्ट्रपतींची निवासस्थाने असतील. काळाची गरज लक्षात घेऊन लोकसभेत ८८८ तर राज्यसभेत ३८४ सदस्यांसाठी आसनव्यवस्था असेल. डिजिटली अद्ययावत असेल नवीन संसद भवन. नवीन संसद भवन भूकंपरोधक असेल.

टॅग्स :ParliamentसंसदNew Delhiनवी दिल्लीCentral Governmentकेंद्र सरकार