शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

अमेरिकेत शीख समाजासंदर्भात असं काय बोलले राहुल गांधी? भाजप नेत्यानं दिली न्यायालयात खेचण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 20:58 IST

यासंदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले, लोकसभेतील विरोधी पक्षनेते परदेशात 'संवेदनशील मुद्द्यांवर' भाष्य करत 'धोकादायक कथा' पेरण्याचा प्रयत्न करत आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत शीख समाजासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. भाजपमधील शीख नेते राहुल गांधी यांच्या शीख समाजासंदर्भातील वक्तव्यावरून त्यांना न्यायालयात खेचण्याची धमकी देत ​​आहेत. या मुद्द्यावरून भाजपने राहुल गांधी यांना निशाण्यावर घेतले आहे.

यासंदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले, लोकसभेतील विरोधी पक्षनेते परदेशात 'संवेदनशील मुद्द्यांवर' भाष्य करत 'धोकादायक कथा' पेरण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल यांच्या टिप्पण्या 'भयानक' आहेत. कारण त्यांनी परदेशात राहणाऱ्या शीख समुदायाच्या सदस्यांमध्ये खोटे पसरवण्याचा प्रयत्न केला आहे.

परदेशात खोट्या गोष्टी पसरतवत आहेत राहुल गांधी - भाजप नेते हरदीप सिंग पुरी म्हणाले, शिखांच्या पगडी आणि काड्यांसंदर्भात त्यांनी (राहुल गांधी) केलेल्या वक्तव्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. राहुल गांधी सध्या राष्ट्रीय अस्मिता, एकता आणि विविधता यांसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर विधाने करत आहेत. एवढेच नाही तर, हे अत्यंत भयानक आहे की, राहुल गांधी माझ्या समाजातील लोकांमध्ये खोट्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, जे कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणे अमेरिकेत आपला उदरनिर्वाह करत आहेत.

...तर राहुल यांना विरोधात खटला भरणार -भाजप प्रवक्ता आरपी सिंग यांनी मंगळवारी राहुल गांधी यांना भारतात शीख समाजासंदर्भातील विधानाचा उनरुच्चार करण्याचे आव्हान दिले. आपण त्यांना न्यायालयात खेचू. आरपी सिंग म्हणाले, काँग्रेस सरकारच्या काळात 1984 च्या दंगलीत दिल्लीत 3000 शीख मारले गेले होते. दिल्लीत 3000 शीखांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या पगड्या काढण्यात आल्या होत्या. त्याचे केस कापण्यात आले होते आणि दाढीही करण्यात आली होती. ते (राहुल गांधी) हे सांगत नाहीत की, तेव्हा ते (काँग्रेस) सत्तेत होते. एवढेच नाही तर, मी राहुल गांधींना आव्हान देतो की त्यांनी भारतात शीखांबद्दल जे बोलत आहेत त्याचा पुनरुच्चार करावा. यानंतर मी त्यांच्यावर खटला दाखल करून त्यांना न्यायालयात खेचेन, असेही आरपी सिंग यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी? - वॉशिंग्टनच्या व्हर्जिनिया उपनगरातील हर्नडॉन येथे भारतीय अमेरिकन समुदायाच्या शेकडो लोकांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गंभीर आरोप केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) काही धर्म, भाषा आणि समुदायांना इतरांच्या तुलनेत निकृष्ट मानतो. भारतात राजकारणासाठी नाही, तर याच गोष्टीसाठी लढई सुरू आहे.

राहुल म्हणाले, आपल्याला सर्वप्रथम हे समजून घ्यावे लागेल की, लढाई कशाच्यासंदर्भात सुरू आहे. लढाई राजकारणाची नाही. तर, एका शीख व्यक्तीने भारतात पगडी अथवा कडे घालावे की नाही, एक शीख म्हणून ती व्यक्ती गुरुद्वाऱ्यात जाऊ शकते की नाही. यासाठी लढाई आहे आणि ही केवळ त्यांच्यासाठीच नाही, तर सर्व धर्मांसाठी आहे. सध्या राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAmericaअमेरिकाcongressकाँग्रेसsikhशीखBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ