शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

What is CAA Or CAB ? | नागरिकत्व सुधारणा विधेयक म्हणजे नक्की आहे तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 9:30 PM

CAA Or CAB Meaning in Marathi गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून बराच गदारोळ सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून बराच गदारोळ सुरू आहे. या विधेयकावरून अनेक मतमतांतरं आहेत. काँग्रेसनं या विधेयकाला विरोध केलेला आहे, तर इतर राजकीय पक्षांनीही या विधेयकावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. विधेयक मंजूर झाल्यास बांगलादेशातून आलेल्या स्थलांतरित हिंदूंची संख्या वाढेल अन् स्थानिकांची संख्या कमी होईल, अशी भीती ईशान्येकडील नागरिकांना सतावते आहे. तसेच विधेयकाला राज्यसभेत मंजुरी मिळाल्यास बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून येणाऱ्या मुस्लिमेतर स्थलांतरितांना भारताच्या नागरिकत्वाचा अधिकार प्राप्त होणार असून, स्थानिकांचे हक्क हिरावून घेतले जाणार असल्याचं सांगत या विधेयकाला विरोध केला जात आहे. पण खरंच Citizenship Amendment Bill 2016 किंवा नागरिकत्व सुधारणा विधेयक 2016 म्हणजे नेमकं आहे तरी काय?, ईशान्येकडील राज्ये या विधेयकाला का विरोध करत आहेत आता हा प्रश्न चर्चेत आला आहे.   काय आहे 'या' नागरिकत्व सुधारणा विधेयकात ?1955ला कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आली होती. त्यावेळी भारताला खेटून असलेल्या म्हणजेच शेजारील असलेल्या राज्यांमधून आलेल्या निर्वासितांना भारतीय नागरिकत्व मिळण्याची तरतूद करण्यात आली. 31 डिसेंबर 2014च्या आधी ज्या निर्वासितांनी येऊन भारतात वास्तव्य केलेलं आहे, अशा मुस्लिमेतर नागरिकांना भारताचं नागरिकत्व बहाल केलं जातं. भारताचा नागरिक होण्यासाठी 11 वर्षं देशात राहणं आवश्यक असल्याचंही संविधानात नमूद केलेलं आहे. पण मोदी सरकारकडून करण्यात आलेल्या बदलानंतर जे मुस्लिमेतर लोक 6 वर्षांहून अधिक काळ भारतात राहिलेले आहेत, अशांना हे भारताचं नागरिकत्व मिळणार आहे.

भाजपाच्या दृष्टीनं या विधेयकाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर ईशान्येतील मुस्लिमेतर मतदार वाढणार असून, त्याचा सर्वाधिक फायदा हा भाजपाला होणार असल्याचं मत काही राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. तर दुसरीकडे विधेयकाला मंजुरी मिळाल्यास ईशान्य भारतातल्या स्थानिकांच्या सांस्कृतिक अस्मितेला धोका पोहोचणार असल्याचीही ओरड मारली जात आहे. ईशान्येकडील आसाम या राज्यावर या विधेयकाचा सर्वाधिक प्रभाव पडणार आहे. कारण आसाममध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अनेक बांगलादेशी, पाकिस्तानी आणि अफगाणिस्तानी नागरिक येऊन वास्तव्य करत आहेत. या विधेयकामुळे आसाम अकॉर्डचा कायदा नाममात्र शिल्लक राहणार असून, आसामी भाषा अन् संस्कृतीला धोका पोहोचण्याची भीती आसामच्या जनतेला सतावते आहे.नागरिकत्व सुधारणा विधेयक अस्तित्वात आल्यास  'आसाम अकॉर्ड 1985' हा कायदा प्रभावहीन होणार आहे. या कायद्यानुसार 24 मार्च 1971नंतर इतर देशांतून आलेल्या लोकांना आसाममधून हद्दपार करण्याचा अधिकार आसाम सरकारकडे आहे. पण नागरिकत्व सुधारणा विधेयक कायदा अस्तित्वात आल्यास आसाम सरकारकडे हे अधिकार राहणार नाहीत. राज्यघटनेत सर्वांना समान वागणूक देण्याची तरतूद आहे. कलम 14 नुसार सर्वांना समान वागणूक दिली जाते. या कायद्यामुळे संविधानाचं उल्लंघन होणार असल्याचंही काही कायदे पंडितांचं मत आहे. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक