शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता? बिहारमध्ये अख्खे पोलीस ठाणे १२ लाखांत विकले गेले, जनता दरबारात महिलेचा आराेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 08:41 IST

Bihar : बिहार पोलिसांच्या निष्क्रियतेचा पाढाही त्या महिलेने मुख्यमंत्र्यांसमक्ष वाचला. 

- एस. पी. सिन्हापाटणा : अख्खे पोलीस ठाणे बारा लाखांत विकले गेले,  असे सांगत एका महिलेने मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दरबारात बिहार पोलिसांच्या भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश केल्याने खळबळ उडाली. बिहार पोलिसांच्या निष्क्रियतेचा पाढाही त्या महिलेने मुख्यमंत्र्यांसमक्ष वाचला. गाऱ्हाणे मांडताना ती महिला म्हणाली की, २०२१ मध्ये माझ्या मुलीची हुंड्यासाठी हत्या करण्यात आली; परंतु, तिच्या सासरच्या लोकांविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. एवढेच नाही, लाचखोर पोलिसांनी न्याय देण्याच्या मोबदल्यात बारा लाख रुपये उकळले. सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी माझ्या मुलीची हत्या केली. पोलीस ठाण्याकडून कोणतेही सहकार्य मिळाले नाही. आता माझ्या मुलाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.

नितीश कुमार झाले अवाक्त्या महिलेचे गाऱ्हाणे ऐकून मुख्यमंत्रीही अवाक् झाले; त्यांनी लागलीच पोलीस महासंचालकांंना फोन लावला. तक्रारदार महिलेला पाठवित आहे. हुंड्यासाठी मागच्या वर्षी हत्या करण्यात आल्याच्या घटनेप्रकरणी अद्याप कारवाई का करण्यात आली नाही, असा सवालही त्यांनी केला.पाटण्याच्या  एका तरुणाने राज्यसभेचे माजी सदस्य आणि लालूप्रसाद यादव यांचे मेहुणे सुभाष यादव यांच्याविरुद्ध तक्रार केली.  सुभाष यादव यांच्या पत्नीशी जमिनीबाबत करार केला होता. दुसऱ्या दिवशीच त्यांनी आम्हाला घरी बोलावून आई-भावाला  ओलीस ठेवले आणि साडेपाच लाख रुपये परत घेतले. पोलीस ठाण्यात गेलो असता गुन्हा दाखल करण्यात आला नाही. 

स्वतंत्र वेळ पाहिजे, सर, माझे ऐकून घ्या...मोतीहारी येथील जेडीयूच्या नेत्या डॉ. कुमकुम यासुद्धा  जनता दरबारात आल्या होत्या. सर, मी जेडीयूची कार्यकर्ती आहे. मला तुमचा स्वतंत्र वेळ पाहिजे. माझे ऐकून घ्या. सुरक्षा कर्मचारी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू लागले, तेव्हा मुख्यमंत्री त्यांना म्हणाले की,  तुम्ही अधिकाऱ्याकडे जाऊन तुमचे म्हणणे मांडा. तुमची तक्रार मी वाचली आहे.जनता दरबारला बिहारच्या विविध भागातून आलेल्या तक्रारदारांनी सरकारी खात्याशी संबंधित गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमक्ष मांडल्या. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या तक्रारींवर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. काही लोकांनी पोलीस कारवाई करीत नसल्याचा आरोप केला, तर काहींनी भूमाफियांशी साटेलोटे असल्याचे उघडपणे सांगितले.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमार