शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदी करून काय मिळाले? चिराग पासवान यांचा मोदी आणि जेटलींना सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 20:31 IST

तीन राज्यांमध्ये झालेल्या पराभवानंतर केंद्रातील सत्ताधारी भाजपाविरोधात मित्रपक्षही आक्रमक झाले आहेत. त्यातच बिहारमध्ये जागावाटपाचे घोडे अडल्याने भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला तडे जाऊ लागले आहेत.

ठळक मुद्देतीन राज्यांमध्ये झालेल्या पराभवानंतर केंद्रातील सत्ताधारी भाजपाविरोधात मित्रपक्षही आक्रमक झाले आहेत. त्यातच बिहारमध्ये जागावाटपाचे घोडे अडल्याने भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला तडे जाऊ लागले आहेत. लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी  आणि वित्तमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहून नोटाबंदीमधून काय साध्य झाले असा सवाल विचारला आहे

नवी दिल्ली - तीन राज्यांमध्ये झालेल्या पराभवानंतर केंद्रातील सत्ताधारी भाजपाविरोधात मित्रपक्षही आक्रमक झाले आहेत. त्यातच बिहारमध्ये जागावाटपाचे घोडे अडल्याने भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला तडे जाऊ लागले आहेत. एकीकडे उपेंद्र कुशवाहा यांच्या पक्षाने आधीच एनडीएची साथ सोडून यूपीएच्या गोटात प्रवेश केला असतानाच आता रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षामधून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. दरम्यान, लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी  आणि वित्तमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहून नोटाबंदीमधून काय साध्य झाले असा सवाल विचारला आहे. चिराग पासवान हे लोकजनशक्ती पार्टीच्या संसदीय समितीचे अध्यक्ष असल्याने त्यांनी लिहिलेल्या पत्राबाबत विविध तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत.  नोटाबंदीला दोन वर्षे झाल्यानंतर नोटाबंदीदरम्यान रांगेत उभ्या असलेल्या लोकांचा मृत्यू झाल्याची कबुली सरकारने राज्यसभेत दिली होती. तसेच नुकत्याच संपन्न झालेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीदरम्यानही नोटाबंदीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. देशाचे माजी वित्तसचिव असलेल्या अरविंद सुब्रह्मण्यम यांनीही नोटाबंदी हा अर्थव्यवस्थेला धक्का देणारा निर्णय होता, असा दावा आपल्या पुस्तकामधून केला होता. त्यानंतर आता भाजपाचा सहयोगी पक्ष असलेल्या लोकजनशक्ती पार्टीने प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने भाजपाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.  दरम्यान, बिहारमधील जागावाटपाबाबत नाराज असलेले रामविलास पासवान आणि चिराग पासवान यांच्याशी भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी आज चर्चा केली. मात्र या चर्चेबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. 

टॅग्स :Demonetisationनिश्चलनीकरणLok Janshakti Partyलोक जनशक्ती पार्टीNarendra Modiनरेंद्र मोदीArun Jaitleyअरूण जेटली