राजीनाम्यानंतर काय म्हणाले अर्णब

By Admin | Updated: November 2, 2016 16:10 IST2016-11-02T10:14:52+5:302016-11-02T16:10:40+5:30

टाइम्स नाऊ वाहिनीची ओळख बनलेले मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी मंगळवारी अचानक राजीनामा देऊन एकच खळबळ उडवून दिली.

What did the aramban say after the resignation? | राजीनाम्यानंतर काय म्हणाले अर्णब

राजीनाम्यानंतर काय म्हणाले अर्णब

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २ - टाइम्स नाऊ वाहिनीची ओळख बनलेले मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी मंगळवारी अचानक राजीनामा देऊन एकच खळबळ उडवून दिली. अर्णब यांनी राजीनामा का दिला ? हा प्रश्न अनेकांना पडला होता. टाइम्स नाऊ वाहिनीवरील 'द न्यूजअवर' या लोकप्रिय डिबेट शो मध्ये येणा-या पाहुण्यांना अर्णब नेशन वाँट्स टू नो व्हाय? हा प्रश्न विचारतात.  
 
राजीनाम्यानंतर याच प्रश्नाचे उत्तर अनेकांना अर्णब यांच्याकडून हवे होते. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार राजीनामा देऊन आल्यानंतर अर्णब यांनी मंगळवारी संध्याकाळी ४.३० वाजता संपादकीय चमूची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आपण टाइम्स नाऊला बनवण्यासाठी कशी मेहनत घेतली त्याचे वर्णन केले. जवळपास ५० जण या बैठकीला उपस्थित होते. 
 
आणखी वाचा 
अर्णब गोस्वामींचा टाइम्स नाऊला टाटा
 
आपण काय पुढे करणार हे अर्णब यांनी जाहीर केलेले नाही पण त्यांनी काही संकेत दिले. स्वतंत्र मिडिया हाऊस सुरु करण्याची अर्णब यांची संकल्पना असल्याचे एका वरिष्ठ पत्रकाराने सांगितले. अर्णबला फक्त टेलिव्हिजन मिडियामध्ये अडकून पडण्यात रस नाही. मिडियामध्ये जे बदल होतायत त्याचे नेतृत्व करण्याची अर्णबची इच्छा आहे असे या पत्रकाराने सांगितले.