शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

Pandora Papers Leak : अनिल अंबानींकडे परदेशात १.३ अब्ज डॉलर्सची संपत्ती, न्यायालयाला सांगितलं होतं नेटवर्थ शून्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 10:14 IST

यापूर्वी Anil Ambani आणि त्यांच्या कंपनीच्या प्रतिनिधींनी परदेशात कोणतीही संपत्ती नसल्याचा दावा न्यायालयात केला होता. जर्सी, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स आणि सायप्रस या ठिकाणी त्यांच्या किमान १८ परदेशी कंपन्या आहेत. 

ठळक मुद्देयापूर्वी Anil Ambani आणि त्यांच्या कंपनीच्या प्रतिनिधींनी परदेशात कोणतीही संपत्ती नसल्याचा दावा न्यायालयात केला होता.जर्सी, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स आणि सायप्रस या ठिकाणी त्यांच्या किमान १८ परदेशी कंपन्या आहेत. 

पाच वर्षांपूर्वी पनामा पेपर  (Panama Paper) लीकनं जगभरातील अनेकाना मोठा धक्का दिला होता. या पेपर लीकमधून अनेक बड्या व्यक्तींच्या बनावट कंपन्या आणि कर चोरीची प्रकरणं समोर आली होती. परंतु आता पुन्हाएकदा ICIJ नं (इंटरनॅशनल कन्सोर्टिअम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट) आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. याचा पर्दाफाश केल्यानंतर भारतातील बड्या व्यक्तींनी त्यावर तोडगा काढण्यास सुरूवात केली होती.दरम्यान, यामध्ये भारतातील उद्योगपती अनिल अंबानी यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये लंडनमधील एका न्यायालयाला आपलं एकूण नेटवर्थ शून्य असल्याचं सांगितलं होतं. चीनच्या तीन बँकांसोबत सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईदरम्यान त्यांचं हे वक्तव्य समोर आलं होतं. सुनावणीदरम्यान, न्यायालयानं अंबानी यांच्या परदेशी संपत्तीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यासंदर्भात न्यायालयाला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. तसंच न्यायालयानं अनिल अंबानी यांना तीन महिन्यांमध्ये ७१६ दशलक्ष डॉलर्सची रक्कम देण्याचे आदेश दिले होते. परंतु अंबानी यांनी तसं न करता आपल्याकडे परदेशात कोणतीही संपत्ती नाही आणि कुठूनही कोणताही फायदाही होत नाही, असं सांगितलं होतं.

इंडियन एक्स्प्रेसद्वारे पँडोरा पेपर्सच्या तपासात रिलायन्स एडीए (Reliance ADA) समूहाचे अध्यक्ष आणित्यांच्या प्रतिनिधींकडे जर्सी, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड आणि सायप्रससारख्या ठिकाणी कमीतकमी १८ परदेशी कंपन्या असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

फोटो सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस

या कंपन्यांची स्थापना २००७ ते २०१० दरम्यान करण्यात आली होती आणि यापैकी सात कंपन्यांना गुंतवणूक आणि कर्जांमध्ये किमान १.३ अब्ज  डॉलर्स मिळाले. जर्सीमध्ये अनिल अंबानींच्या नावे बॅटिस्ट अनलिमिटेड, रेडियम अनलिमिटेड आणि ह्युई इन्व्हेस्टमेंट्स अनलिमिटेड या तीन कंपन्या आहेत. या सर्व कंपन्यांची स्थापना डिसेंबर २००७ आणि जानेवारी २००८ मध्ये करण्यात आल्याचंही इंडियन एक्स्प्रेसनं म्हटलं आहे.

कोणाकडे मालकी हक्क?बॅटिस्ट अनलिमिटेडची मालकी रिलायन्स इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेडकडे आहे, ज्याचे नेतृत्व अनिल अंबानी यांच्या मालकीच्या एडीए ग्रुप कंपनीकडे आहे. ह्यूई इन्व्हेस्टमेंट अनलिमिटेडची मालकाचं नाव एएए एन्टरप्राईज लिमिटेड आहे (जी २०१४ पासून रिलायन्स इन्सेप्टम प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखली जाते). याची प्रमोटर कंपनी रिलायन्स कॅपिटल आहे.

दरम्यान, रेकॉर्ड्सनुसार जानेवारी २००८ मध्ये जर्सीमध्ये दोन आणखी कंपन्यांची स्थापना करण्यात आली. समरहिल लिमिटेड आणि डलविच लिमिडेट अशी या कंपन्यांची नावं आहेत. याचे मालक हे अनूप दलाल हे आहेत. तसंच ते अनिल अंबानी यांचे प्रतिनिधीही आहेत. त्यांच्या नावे आणखी एक बीवीआय (BVI) कंपनी आहे, याचं नाव रिंडिअर डोल्डिंग्स लिमिटेड आहे. ही कंपनी इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटचं काम करते. 

याशिवाय लॉरेन्स म्युच्युअल, रिचर्ड इक्विटी लिमिटेड आणि जर्मन इक्विटी लिमिटेड या तिन्ही कंपन्या जर्सीमध्ये आहेत आणि जेनेव्हाच्या एका वकिलाकडे त्याचे मालकी हक्क आहेत. रेकॉर्ड्सनुसार त्यांना सेवा देणाऱ्या सात फर्म्सना रिलायन्स/अनिल अंबानींच्या गॅरंटीवरून गुंतवणूकीसाठी कर्ज देण्यात आलं आहे. हे गुंतवणूकीचे पैसे दुसऱ्या कंपन्यांना कर्ज देऊन फिरवण्यात आले होते. 

काही प्रमुख देवाणघेवाणइंडियन एक्स्प्रेसद्वारे करण्यात आलेल्या शोधमोहिमेत काही प्रमुख देवाणघेवाण समोर आली आहे. बॅटिस्ट अनलिमिटेड आणि रेडिअम अनलिमिटेडच्या रेकॉर्ड्सनुसार या कंपन्यांनी ५०० दशलक्ष डॉलर्स आणि २२० दशलक्ष डॉलर्सचं कर्ज आयसीआयसीआयकडून घेतलं होतं. या रकमेतून एएए कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडसाठी सीसीपीएस (कंपलसरी कन्व्हर्चटिंबल प्रेफरन्स शेअर्स) घ्यायचे होते. ही अनिल अंबानींशी निगडीत एक मुंबईतील रिअल इस्टेट कंपनी आहे. 

डलविचनं युनायटेड किंगडमच्या रॉकक्लिफ ग्रुपकडून ३३ मिलियन डॉलर्स घेतले होते. ही रक्कम सबस्क्रिप्शन अॅग्रीमेंटद्वारे मॉरिशसच्या एका प्रायव्हेट फंडद्वारे घेण्यात आली होती. या फंडनं पिपावाव शिपयार्डमध्ये आपला तीन टक्के हिस्सा विकला होता. २००९-१० पासून ती अनिल अंबानी यांच्याद्वारे प्रमोटेड रिलायन्स नेव्हलकडे आहे. 

टॅग्स :Anil Ambaniअनिल अंबानीPandora Papers Leakपँडोरा पेपर्सMONEYपैसा