शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

५०० वर्षांपूर्वी बाबरनं जे केलं, तेच आज संभलमध्ये घडतंय... योगी आदित्यनाथांचा जोरदार हल्लाबोल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 15:33 IST

CM Yogi Adityanath in Ayodhya : लोकांमध्ये विभाजन करणारे ते लोक आहेत, ज्यांनी जगातील अनेक देशांमध्ये मालमत्ता खरेदी केली आहे. कारण, इथे संकट आले की, तिकडे पळून जाता येईल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

CM Yogi Adityanath in Ayodhya : अयोध्या : अयोध्येत ४३ व्या रामायण मेळाव्याचे उद्घाटन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी, मुख्यमंत्री योगी आदित्यना यांनी विरोधकांवर तसेच राज्याचे वातावरण बिघडवत असलेल्या घटकांवर जोरदार हल्लाबोल केला. जे काम बाबरच्या एका सेनापतीने ५०० वर्षांपूर्वी अयोध्येत केले होते, तेच काम आज संभल आणि शेजारील बांगलादेशात केले जात आहे. त्या सर्वांचा डीएनए एकच आहे, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.

आजही समाजाच्या जडणघडणीला तडा देणारे लोक येथे उभे आहेत. सामाजिक एकात्मता भंग करून आम्हा लोकांमध्ये फूट पाडण्याची पूर्ण व्यवस्थाही करत आहोत. लोकांमध्ये विभाजन करणारे ते लोक आहेत, ज्यांनी जगातील अनेक देशांमध्ये मालमत्ता खरेदी केली आहे. कारण, इथे संकट आले की, तिकडे पळून जाता येईल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

संभल आणि बांगलादेशमध्ये जे काही घडत आहे, त्या सर्वांचा डीएनए एकच आहे, असे म्हणत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संभल हिंसाचार प्रकरणावरून संताप व्यक्त केला. तसेच, भगवान श्रीरामांनी समाज आणि भारत यांना जोडण्याचे काम केले. अयोध्या हे भगवान रामप्रती भारताच्या भक्तीचे प्रतीक आहे. प्रभू राम आणि जानकी यांच्याबद्दल ज्यांच्या मनात श्रद्धा नाही, त्यांचा कट्टर शत्रूप्रमाणे त्याग केला पाहिजे, असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. 

डॉ. राम मनोहर लोहिया यांचा उल्लेख रामायण मेळा १९८२ मध्ये सुरू झाला. त्याआधी डॉ. राम मनोहर लोहिया यांनी देशाच्या विविध भागात रामायण मेळावे सुरू केले होते. डॉ. राम मनोहर लोहिया यांचा जन्म याच अयोध्येत आणि आजच्या आंबेडकर नगरीत झाला. ते खूप शिकलेले होते, मात्र मंदिरात जात नव्हते. समाजवादी विचारवंत होते. त्यांनी म्हटले होते की, राम, कृष्ण आणि महादेव या तीन देवांवर जोपर्यंत भारताची श्रद्धा आहे, तोपर्यंत देशाचे कोणीही काहीही करू शकत नाही, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशAyodhyaअयोध्याBangladeshबांगलादेशChief Ministerमुख्यमंत्री