मोकाट कुत्र्यांवर काय उपाययोजना आहेत

By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:18+5:302015-01-22T00:07:18+5:30

हायकोर्टाचा प्रश्न : माहिती देण्याचे मनपाला निर्देश

What are the measures on dogs? | मोकाट कुत्र्यांवर काय उपाययोजना आहेत

मोकाट कुत्र्यांवर काय उपाययोजना आहेत

यकोर्टाचा प्रश्न : माहिती देण्याचे मनपाला निर्देश

नागपूर : शहरातील मोकाट कुत्र्यांची समस्या दूर करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत, यावर महापालिकेने दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करावे असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिलेत.
शहरात मोकाट कुत्रे हैदोस घालीत असल्यामुळे अनिरुद्ध गुप्ते व इतरांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मृदुला भटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. महानगरपालिका कारवाई करीत नसल्यामुळे मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. रस्त्याने जाणाऱ्या वाहनांवर कुत्र्यांच्या टोळ्या झडप घालतात. मोटरसायकल असल्यास चालक एकतर करकचून ब्रेक दाबतो किंवा कुत्रे चावण्याच्या भीतीमुळे गाडीसह रोडवर कोसळतो. अशावेळी मागून येणारी वाहनेही एकमेकांवर आदळतात. मोकाट कुत्र्यांची रात्री सर्वाधिक भीती असते. शासकीय इमारती व रुग्णालयांमध्ये मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार असतो. मेडिकलमध्ये नवजात बाळांना कुत्र्यांनी कुरतडून खाल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. यासंदर्भात महानगरपालिकेने गंभीरतेने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली.

Web Title: What are the measures on dogs?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.