शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कुमारस्वामींच्या शपथविधीचा नेमका खर्च किती? ताजच्या वेबसाईटवर भलतेच दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 16:30 IST

बिले कित्येक पटींनी वाढवल्याचे उघड; कुमारस्वामींचा बोलण्यास नकार

बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या शपथविधीला तब्बल 42 लाखांचा खर्च झाल्याचे समोर आले होते. यावरून जेडीएसवर टीकाही झाली होती. मात्र, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या खर्चावरची लाखोंची बिले पाहून ती मुद्दामहून वाढवली गेली नाहीत ना, याबाबत शंकेस वाव मिळत आहे. 

केजरीवाल यांनी एका रात्रीत 1.85 लाख तर नायडू यांनी 9 लाख रुपये खर्च झाल्याचे वृत्त आले होते. मात्र, हे दोघेही थांबलेल्या ताजच्या वेस्ट एंड हॉटेलचे दर पाहता एवढे पैसे त्यांनी कुठे खर्च केले याचा थांगपत्ताच लागत नाही. ताजच्या वेबसाइटवर प्रिमियम श्रेणीतील स्वीटचा दर हा 35 हजार रुपये आहे. तर नायडू यांच्या स्वीटचे भाडे तब्बल 2 लाख दाखविण्यात आले आहे. म्हणजेच जवळपास सहा पट अधिक दर लावण्यात आला आहे. तसेच बिलानुसार नायडू यांनी 23 मेच्या रात्री 2.13 लाखांचे जेवण आणि ज्युस पिल्याचे दाखिवण्यात आले आहे. मात्र, काही तासांतच हे बिल 8.3 लाखांवर पोहोचले.

केजरीवाल आणि नायडू या दोन्ही नेत्यांना या टीकेला सामोरे जावे लागल्याने त्यांनी कर्नाटक सरकारकडे खुलासा मागितला आहे. केजरीवाल यांच्या राहण्याचे आणि जेवणाचे बिल तर 1.85 लाख रुपये दाखविण्यात आले आहे. या प्रकरणी कुमारस्वामी यांनी बोलण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे या नेत्यांनी चौकशीची मागणी केल्याचे समजते. मात्र, मुख्य सचिव टीएम विजय भास्कर यांनी आपल्याकडे कोणीही चौकशीची मागणी केली नसल्याचे सांगितले. 

कुमारस्वामी यांच्या शपथविधी केवळ 7 मिनिटांचा होता. मात्र, त्यावर कर्नाटक सरकारने  42 लाख रुपये खर्च केल्याचे वृत्त गुरुवारी पसरले होते. यावरून जेडीएसने हे बिल भरण्याची मागणी भाजपच्या नेत्यांनी केली होती.

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीArvind Kejriwalअरविंद केजरीवालChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूKarnatak Politicsकर्नाटक राजकारण