‘त्या’ तरुणांवर काय कारवाई करायची?

By Admin | Updated: October 6, 2014 00:18 IST2014-10-06T00:18:00+5:302014-10-06T00:18:00+5:30

‘इसिस’ या संघटनेत सामील झालेले भारतीय तरुण स्वदेशी परतलेच तर त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारायचा की मानवतावादी दृष्टिकोनातून

What action should be taken against those 'youngsters'? | ‘त्या’ तरुणांवर काय कारवाई करायची?

‘त्या’ तरुणांवर काय कारवाई करायची?

नवी दिल्ली : ‘इसिस’ या संघटनेत सामील झालेले भारतीय तरुण स्वदेशी परतलेच तर त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारायचा की मानवतावादी दृष्टिकोनातून पाळत ठेवून त्यांच्या डोक्यात शिरलेले ‘भूत’ काढण्याचा प्रयत्न करायचा, असा पेच सरकारपुढे निर्माण झाल्याचे वृत्त आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने ‘इसिस’विरुद्ध गुन्हा नोंदविण्याचा प्रस्ताव गृह मंत्रालयाकडे केला आहे. फौैजदारी कायद्यानुसार ‘एफआयआर’ नोंदविल्याखेरीज तपासी संस्थेला तपासाचा अधिकार मिळत नाही. युनोच्या दहशतवादविरोधी करारांचा आधार घेऊन ‘इसिस’विरुद्ध ‘एफआयआर’ नोंदविणे शक्य आहे. तसे केले व प्रत्यक्षात भारतीय युवक परत आले नाहीत तरी निदान त्यांची डोकी भडकाविणाऱ्यांपर्यंत तरी पोहोचता येईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)



 

Web Title: What action should be taken against those 'youngsters'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.