कुजबूज--26 ऑगस्ट
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:52+5:302015-08-26T23:32:52+5:30
चतुर्थीपूर्वी गुड न्यूज

कुजबूज--26 ऑगस्ट
च ुर्थीपूर्वी गुड न्यूजम.गो. पक्षाच्या एखाद्या मंत्र्याला किंवा भाजपच्या मंत्री एलिना साल्ढाणा यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाईल, अशी चर्चा विविध ठिकाणी सुरू असली तरी प्रत्यक्षात चतुर्थीपूर्वी कुणालाच मंत्रिमंडळातून वगळले जाणार नाही. भाजपच्या एका नेत्याने बुधवारी पणजीत पत्रकारांशी सहज व अनौपचारिकपणे गप्पा मारताना तसे सांगितले. चतुर्थीपूर्वी आम्ही फक्त गुड न्यूज देऊ, म्हणजे एका भाजप आमदाराला मंत्रिपद दिले जाईल. चतुर्थीपूर्वी तरी मंत्रिमंडळातून कुणालाच वगळले जाणार नाही. चतुर्थीनंतर कोणते राजकीय निर्णय घेतले जातील ते सांगता येणार नाहीत, असे या भाजप नेत्याने म्हटले. अनंत शेट हे ज्येष्ठ आमदार असल्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळेल; पण पालिका निवडणुकीनंतर राज्यातील सर्व राजकीय समीकरणेच बदलली जाऊ शकतात. पालिका निवडणुकीवेळी आपल्याला किती प्रमाणात यश मिळते, याचा अंदाज भाजप घेणार आहे.............कूळ चळवळीचे काय?कूळ कायद्यातील दुरुस्त्यांविरुद्ध मध्यंतरी जी जोरदार चळवळ सुरू झाली होती, ती आता थंडावली आहे. यामागील कारण काय ते स्पष्ट होत नाही. बहुजन महासंघ वगैरे स्थापन करताना विविध समाजातील नेत्यांनी जो उत्साह दाखविला होता तो लगेच मावळला. कूळ व मुंडकार कायद्यातील सनसेट कलम काढून टाकले म्हणून होत नाही. खरा प्रश्न कुळांचे खटले काढून न्यायालयात दिल्याने निर्माण झाला आहे. अन्यही काही दुरुस्त्या मारक ठरल्या आहेत. त्याबाबत यापूर्वी काही घटकांनी जागृती केली आहे; पण ज्याप्रमाणे राजकीय पक्षांवर दबाव येतो तसाच दबाव एनजीओंवरही येत असावा व त्यामुळेच चळवळी पुढे जात नसाव्यात. कूळ कायद्यातील दुरुस्त्यांविरुद्ध विविध समाजांचे नेते एकत्र आले होते; पण नंतर त्यांनी फार काही केले असे दिसून आले नाही.