शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

App For Farmers : ओला- उबरसारखे शेतकरी मागवतील अ‍ॅपद्वारे ट्रॅक्टर; मोदी सरकारची योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 02:32 IST

App For Farmers : पंचवीसहून अधिक उपकरणे उपलब्ध

नवी दिल्ली: कृषी मंत्रालयाने खास शेतकऱ्यांसाठी एक अ‍ॅप तयार केले आहे. ओला आणि उबरच्या कार्यपद्धतीच्या धर्तीवर या अ‍ॅपद्वारे शेतकरी ट्रॅक्टरसह अन्य शेतीशी निगडीत उपकरणांची मागणी करु शकतील. यासाठी शेतकऱ्यांना काही भाडे द्यावे लागणार आहे. या अ‍ॅपद्वारे शेतकऱ्यांना कस्टम हायरिंग सेंटर्सच्या माध्यमातून शेतीला लागणारे साहित्य पुरविले जाणार आहे. यासाठी देशभरात ३५ हजार कस्टम हायरिंग सेंटर्स तयार करण्यात आले असून वर्षाला अडिच लाख कृषी उपयोगी साहित्य, साधने व उपकरणे भाड्याने देण्याची क्षमता आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेवरील मंदीचे मळभ आता अधिकच गडद होताना दिसत आहे. याचाच सर्वाधिक जास्त फटका ऑटोमोबाईल क्षेत्राला बसला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ऑटोमोबाईल क्षेत्रात आलेल्या मंदीसाठी अजब कारण सांगितले आहे. ओला, उबरसारख्या टॅक्सी सेवांना मिळत असलेला वाढता प्रतिसाद कारच्या विक्रीवर प्रभाव पाडत आहे. लोकांच्या विचारसरणीत झालेला बदल आणि बीएस-६ मॉडेल या क्षेत्रातील मंदीसाठी जबाबदार आहे, असे निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे.

हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोरमधून डाऊनलोड करता येणार आहे. हे अ‍ॅप इंग्रजी, हिंदी, उर्दू, नेपाळी, कन्नड, मराठी, बंगालीसह १२ विविध भाषांतून उपलब्ध आहे. अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर आपली भाषा निवडावी लागणार आहे. त्यानंतर उऌउ/सर्व्हिस प्रोव्हायडर आणि शेतकरी/वापरकर्ता अशा दोन कॅटेगरी दिसतील. यातील शेतकरी/वापरकर्ता कॅटगरी निवडून नोंदणी करावी लागेल. नोंदणीसाठी शेतकºयांचे नाव, पत्ता आणि मोबाईल नंबरसह इतर माहिती द्यावी लागेल. यानंतरच्या पायरीवर डॅशबोर्ड ओपन होईल. या डॅशबोर्डमध्ये ‘कृषी यंत्र की बुकिंग’सह सात वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. ‘कृषी यंत्र की बुकिंग’ची कॅटेगरी निवड केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर आपल्याला आवश्यक ते कृषी उपयोगी साहित्य, साधने व उपकरणे यंची निवड करावी लागेल. यामध्ये ट्रॅक्टर, ट्रेलर, हॅप्पी सीडसह २५हून अधिक उपकरणे मिळतील.

टॅग्स :FarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदीAgriculture Sectorशेती क्षेत्र