म्हणे, पश्चिम रेल्वेचे मुख्यालय गुजरातेत हवे
By Admin | Updated: November 29, 2014 02:27 IST2014-11-29T02:27:39+5:302014-11-29T02:27:39+5:30
पश्चिम रेल्वेचे मुंबई येथील मुख्य कार्यालय अहमदाबादला हलविण्यासाठी भाजपा खासदाराने लोकसभेत केलेल्या मागणीवरून राज्यातील शिवसेना व काँग्रेस खासदार कमालीचे आक्रमक झाले आहेत.

म्हणे, पश्चिम रेल्वेचे मुख्यालय गुजरातेत हवे
भाजपा खासदाराची मागणी : शिवसेना, काँग्रेस लोकसभेत आक्रमक
नवी दिल्ली : पश्चिम रेल्वेचे मुंबई येथील मुख्य कार्यालय अहमदाबादला हलविण्यासाठी भाजपा खासदाराने लोकसभेत केलेल्या मागणीवरून राज्यातील शिवसेना व काँग्रेस खासदार कमालीचे आक्रमक झाले आहेत. त्यातून महाराष्ट्र-गुजरात असा प्रादेशिक अस्मितेचा वाद विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत.
प. रेल्वेचे मुख्यालय गुजरातेत हलविण्याच्या मागणीवर सोमवारी लोकसभेतच भाजपाचा त्रिफळा उडवण्याचा इशारा देणा:या काँग्रेस- शिवसेनेने दक्षिण रेल्वेचे मुख्यालय सिकंदराबाद आहे, ते पहिले नांदडेला आणा, असे प्रतिआव्हानही दिले. तर राष्ट्रवादीने या विधानाचा निषेध करीत असल्याचे सांगून पक्ष स्तरावर भूमिका घेऊ, असे म्हटले. शुक्रवारी शून्य प्रहरात अहमदाबाद (पश्चिम)चे भाजपा खा. किरीट सोलंकी यांनी पश्चिम रेल्वेचे कामकाज सोपे व्हावे म्हणून मुंबईत असलेले पश्चिम रेल्वेचे कार्यालय अहमदाबाद येथे स्थानांतरित करावे, अशी मागणी केली. अहमदाबाद हे शहर मध्यवर्ती असून, तेथून रेल्वेचे कामकाज सुलभ होऊ शकेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. मुंबई- महाराष्ट्राच्या जिव्हाळ्य़ाचा हा विषय असल्याने त्याला सभागृहात कडाडून विरोध होईल, अशी शक्यता असताना शून्य प्रहर संपेस्तोवर विरोध करायला शिवसेनेचा एकही खासदार सभागृहात उपस्थित नव्हता. बहुतेकांनी मुंबई गाठली होती, तर काही पक्षाच्या कामासाठी संसदेतीलच पक्ष कार्यालयात होते. दुपारनंतर या विषयाला सभागृहाबाहेर पाय फुटल्यावर वसेनेने भूमिका घेण्याची तयारी केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सेनेने घेतला समाचार
शिवसेना प्रवक्ते खा. अरविंद सावंत यांनी सोलंकींच्या विधानाचा समाचार घेतला. सावंत म्हणाले, की जे जे महाराष्ट्रात चांगले आहे, ते सर्वच गुजरातकडे नेण्याची सुरू असलेली तयारी हाणून पाडू. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या मुख्यालयामुळे कोणती गैरसोय होत आहे. इतकी वर्षे चांगले सुरू आहे, काहीच बिघडत नाही. बेळगावचे ‘बेळगावी’ झाले ते सहन करायचे, हि:याचे कारखाने गुजरातला न्यायचे, रिझव्र्ह बँकेचा एक विभाग न्यायचा, एअर इंडियाचे कार्यालय पळवायचे, आता ही नवी मागणी गुजरातमधूनच करायची हा प्रकार त्यांनी थांबवावा.
मनसुबे उधळून लावू
च्काँग्रेसचे खा. राजीव सातव म्हणाले,
भाजपाचे मराठी अस्मितेला तडे देण्याचे
हे मनसुबे उधळून लावू. दक्षिण रेल्वेचे मुख्यालय नांदेडला आणा, ही आमची
3क् वर्षापासूनची मागणी आहे.
च्अकोला, वाशीमपासून प्रवाशी यामुळे अडचणीत आले आहेत. गेल्या अधिवेशनात मी आणि खा. चंद्रकात खैरे यांनी ही मागमी केली होती. त्यावर सरकारचे उत्तरच नाही, आणि आता ही नवीनच मागणी पुढे करून वाद उकरून काढण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे.
च्मोदी हे गोपीनाथ मुंडे यांना लहान भाऊ मानायचे, त्यामुळे रेल्वे सुरू करत असलेल्या विद्यापीठाला मुंडेंचे नाव दिले पाहिजे, अशी मागणी सातव यांनी केली.
च्राष्ट्रवादीचे खा. धनंजय महाडिक म्हणाले, भाजपा खासदाराची मागणी संतापजनक आहे. निषेधच करतो. पक्ष याबाबत सोमवारी भूमिका घेमार आहे, असे ते म्हणाले.
16 हजार कोटींचे उत्पन्न प. रेल्वेला उपनगरीय लोकल, मालवाहतूक व लांब पल्ल्याच्या वाहतूकमधून वर्षाला मिळते.
100ट्रेन पश्चिम रेल्वेमार्गावर गुजरात ते मुंबई प्रवासासाठी धावतात. यातून मोठे उत्पन्न मिळते.
उत्पन्नावर डोळा?
प. रेल्वेच्या हजारो कोटी रुपयांच्या उत्पन्नावर गुजरातचा डोळा असल्यानेच मुख्यालय तिकडे हलवण्याची मागणी होत आहे. मालवाहतूक व लांब पल्ल्याची सर्वाधिक वाहतूक गुजरातेतनूच होत असल्याने थेट हाच दावा न करता वेगळे कारण पुढे करीत असल्याची चर्चा आहे.