शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सुखी संसाराचं स्वप्न अधूरं राहिलं! लग्नानंतर काही मिनिटांत नववधू विधवा, नवरदेवाला आला हार्ट अटॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 22:43 IST

नव्या नवरीच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू असताना एक भयंकर घटना घडली आणि क्षणात हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं आहे.

नवी दिल्ली - घरात लग्नाची, नव्या नवरीच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू असताना एक भयंकर घटना घडली आणि क्षणात हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं आहे. एका जोडप्याचं सुखी संसाराचं स्वप्न अधूरं राहिलं आहे. लग्नानंतर अवघ्या काही मिनिटांतच नववधू विधवा झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लग्न मंडपात नवरदेवाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. लग्न करून नववधूला घरी घेऊन आलेल्या तरुणाला अचानक चक्कर आली. नातेवाईकांनी तातडीने त्याला रुग्णालयामध्ये दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्याने हसतं खेळतं घर क्षणात उद्ध्वस्त झालं आहे. 

हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त झालं! 

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या चंपारण जिल्ह्यातील बेतिया भागात राहणाऱ्या चंदेश्वर गिरी यांच्या मुलगा मनीष गिरी याचं अमेठिया गावातील चंदा नावाच्या तरुणीसोबत लग्न ठरलं होतं. लग्नाच्या आधीच्या रात्री मनिषला चक्कर आली होती. मात्र लग्नाच्या दगदगीमुळे त्याला चक्कर आली असावी, असं सर्वांना वाटलं होतं. त्यावेळी काही मिनिटांची विश्रांती घेऊन तो पुन्हा कामाला लागला होता. त्यानंतर लग्नसोहळा थाटामाटात संपन्न झाला. अनेक लोकांची लग्नाला उपस्थिती होती.

मंडपात नवरदेवाचा हार्ट अटॅकने मृत्यू

मध्यरात्री सुमारे तीन वाजण्याच्या सुमाराला लग्नाचे सर्व विधी पार पडले आणि त्यानंतर मनीष नववधूला घेऊन आपल्या घरी आला होता. घरी आल्यानंतर काही वेळातच त्याला पुन्हा एकदा चक्कर आली. त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्या अवस्थेत त्याच्या नातेवाईकांनी मनीषला रुग्णालयामध्ये दाखल केलं. डॉक्टर मनीषला डिस्चार्ज देतील, अशी नातेवाईकांची अपेक्षा होती. मात्र डॉक्टरांनी मनिषचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आणि नववधूच्या पायाखालची जमीनच सरकली. मनीषला हार्ट अटॅक आल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे काही मिनिटांआधी नववधू म्हणून घरात आलेली चंदा विधवा झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :marriageलग्न