शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्लॅटफॉर्मवर बोलत होता TTE, तेवढ्यात हाय टेंशन तार पडली अन्...; VIDEO पाहून तुम्हीही स्तब्ध व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 18:00 IST

या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही स्तब्ध व्हाल.

रेल्वे प्लॅटफॉर्मवर दोन TTE बोलत असतानाच अचानकपणे हाय टेंशन विजेची तार तुटल्याने, एका टीटीईला विजेचा धक्का बसल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी दुपारी पश्चिम बंगालमधील पश्चिम मेदिनीपूरच्या खडगपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर चारवर घडली. सुजान सिंह सरदार असे या टीटीईचे नाव आहे. ते थोडक्यात बचावले असून खडगपूर रेल्वे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही स्तब्ध व्हाल.

माध्यमांतील वृत्तांनुसार सुजान प्लॅटफॉर्म नंबर 4 च्या फुट ओव्हरब्रिजसमोर आपल्या एका सहकाऱ्यासोबत बोलत होता. त्याच वेळी हा अपघात घडला. यासंदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

प्लॅटफॉर्मवर सहकाऱ्यासोबत बोलत होता टीटीई -संबंधित घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. यात सुजानसिंह सरदार त्यांच्या एका टीटीई सहकाऱ्यासोबत बोलताना दिसत आहे. तेवढ्यात एक विजेची तार अचानक तुटते आणि तिचा स्पर्श सुजानला होतो. विजेचा धक्का बसल्यानंतर सुजन बेशुद्ध होऊन रेल्वे ट्रॅकवर पडतो. यावेळी त्याचा सहकारीही गडबडतो आणि तेथून बाजूला होतो.  यानंतर प्लॅटफॉर्मवरील उपस्थित लोक आणि रेल्वे कर्मचारी सुजानला वाचविण्यासाठी धावतात. यासंदर्भात बोलताना, दक्षिण पूर्व रेल्वे खरगपूर शाखेचे वरिष्ठ डीसीएम राजेश कुमार म्हणाले, “विद्युत तार कशामुळे तुटली, याचा तपास आम्ही करत आहोत. सध्या टीटीईची स्वस्थ आहे. 

विजेचा धक्का बसल्याने सुजान सिंह सरदार रेल्वे लाइनवर पडला. यानंतर, आरपीएफ आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्याला रेस्क्यू करत खडगपूर रेल्वेच्या मुख्य रुग्णालयात भरती केले आहे. तो सध्या बरा आहे, असे राजेश कुमार यांनी म्हटले आहे.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालrailwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेelectricityवीज