शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालमध्ये ईडीचा मोठा छापा; जप्त केलेल्या नोटांचा ढीग पाहून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 22:29 IST

ED Raids: छापेमारीत अनेक आपत्तीजनक दस्तावेज आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

कोलकाता : पश्चिम बंगालमधील  (West Bengal) शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने(ED)आज मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्यासह काही मंत्री, सरकारी अधिकारी, दलाल आणि खासगी व्यक्तींच्या घरावर छापे टाकले. यादरम्यान 20 कोटी रुपयांहून अधिक रोकड, विदेशी चलन आणि सोने इत्यादी जप्त केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, छापेमारीत अनेक आपत्तीजनक दस्तावेज आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, छापे टाकण्यात आलेल्यांमध्ये पश्चिम बंगालचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पार्थ चॅटर्जी, माजी शिक्षण मंत्री परेश अधिकारी, पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष आणि तत्कालीन शिक्षण मंत्री आमदार माणिक भट्टाचार्य यांचा समावेश आहे. स्पेशल ड्युटी पीके बंदोपाध्याय आणि तत्कालीन मंत्र्यांच्या खासगी सचिव सुकांता आचार्जी यांचा सहभाग आहे.

ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, छापे टाकण्यात आलेल्यांमध्ये पश्चिम बंगालचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पार्थ चॅटर्जी, माजी शिक्षण मंत्री परेश अधिकारी, पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष आणि तत्कालीन शिक्षण मंत्री आमदार माणिक भट्टाचार्य यांचा समावेश आहे. स्पेशल ड्युटी पीके बंदोपाध्याय आणि तत्कालीन मंत्र्यांच्या खासगी सचिव सुकांता आचार्जी यांचा सहभाग आहे.

अर्पिता मुखर्जीच्या ठिकाणावरही ईडीने छापे टाकले. अर्पिता मुखर्जी मंत्री पार्थ चॅटर्जी यांची जवळची सहकारी असल्याचे सांगितले जाते. याशिवाय, पश्चिम बंगाल माध्यमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष कल्याणमय गांगुली, पश्चिम बंगाल केंद्रीय शाळा सेवा आयोगाचे माजी अध्यक्ष सौमित्र सरकार, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव आलोक कुमार सरकार, शिक्षकांच्या नोकऱ्या विकणारा एजंट चंदन मंडल उर्फ ​​रंजन इत्यादींचा समावेश आहे.

20 मोबाईल जप्त ईडीने दावा केला आहे की,  या छाप्यादरम्यान अर्पिता मुखर्जीच्या घरातून 20 कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम स्टाफ सिलेक्शन कमिशन घोटाळ्याशी संबंधित असण्याची शक्यता ईडीला आहे. ही रक्कम मोजण्यासाठी ईडीच्या पथकाने बँक अधिकारी आणि नोट मोजणी यंत्रांची मदत घेतली. याशिवाय, त्यांच्याकडून 20 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. अर्पिता मुखर्जीने इतके फोन का वापरले? या संदर्भातही चौकशी सुरू आहे.

सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवले होते. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी लवकरच अनेक नेते आणि सरकारी अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय