शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

West Bengal : क्रिकेटचा ‘दादा’ उतरणार राजकारणाच्या मैदानात? राज्यपालांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण!

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: December 27, 2020 19:38 IST

गेल्या काही दिवसांपासून गांगुली भाजपमध्ये जाण्याची चर्चा सुरू आहे. यातच गांगुली आणि जगदीप धनखड यांच्या भेटीमुळे या चर्चेला अधिक बळकटी मिळाल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून गांगुली भाजपमध्ये जाण्याची चर्चा सुरू आहे.आज गांगुलीने पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेतली. 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त केंद्रीय गृह मंत्री अमित शाह पश्चिम बंगाल दौरा आहेत.

कोलकाता - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीराजकारणात उतरणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आज गांगुलीने पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेतली. यामुळे गांगुली भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ही एक खासगी भेट असल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून गांगुली भाजपमध्ये जाण्याची चर्चा सुरू आहे. यातच गांगुली आणि जगदीप धनखड यांच्या भेटीमुळे या चर्चेला अधिक बळकटी मिळाल्याचे बोलले जात आहे. आज गांगुलीने पश्चिम बंगालमध्ये निष्पक्ष निवडणुकांसंदर्भातही भाष्य केले. पश्चिम बंगालमध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाजपकडून सौरभ गांगूलीला राजकीय आखाड्यात उतरवले जाऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, गांगुलीने अद्याप यासंदर्भात कुठल्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

सौरव गांगुली होऊ शकतो भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा - अमित शाह यांनी कोलकाता दौऱ्यावर असताना बंगालचा भूमिपुत्रच बंगालचा मुख्यमंत्री होईल, असे सूचक विधान केले होते. त्यामुळे बंगालचा भूमिपुत्र सौरभ गांगुलीच आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही दिवसांपूर्वी टीएमसीच्या बाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार वैशाली डालमिया यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे वैशाली यांचे गांगुली कुटुंबाशी चांगले संबंध आहेत. एवढेच नाही, तर टीएमसीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना बाहेरचे लोक, असे संबोधले गेले होते. यावर वैशाली यांनी आक्षेप घेतला होता.

गांगुली 'या' दिवशी करू शकतो भाजपत प्रवेश -माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त केंद्रीय गृह मंत्री अमित शाह पश्चिम बंगाल दौरा आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्यादरम्यान अनेक लोक भाजपत प्रवेश करू शकतात. बोलले जात आहे, की गांगुलीदेखील यावेळी भाजपमध्ये प्रवेश करू शकतो.

टॅग्स :Saurav Gangulyसौरभ गांगुलीwest bengalपश्चिम बंगालPoliticsराजकारणBJPभाजपा