शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ममता बॅनर्जी भाजपला जोरदार धक्का देणार? तब्बल ३३ आमदार पक्षांतराच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 11:58 IST

मुकूल रॉय यांच्यासह तब्बल ३३ आमदार भाजपला रामराम करण्याची शक्यता

कोलकाता: पश्चिम बंगालमधील वेगवान राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीआधी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधून अनेक नेते आणि आमदार भारतीय जनता पक्षात गेले. भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू होतं. मात्र तृणमूलनं तब्बल २०० हून जास्त जागा मिळवत सत्ता राखल्यानंतर आता भाजपला ओहोटी लागण्याची चिन्हं आहेत. भाजपचे ३३ आमदार तृणमूलच्या वाटेवर असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भाजपला मोठं भगदाड पडू शकतं.सुवेंदू अधिकारी यांच्यासह तृणमूलच्या बड्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीआधी कमळ हाती घेतलं. सुवेंदू यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभवदेखील केला. मात्र ममता यांनी राज्याची सत्ता राखली. त्यामुळे आता भाजपमध्ये गेलेले तृणमूलचे अनेक नेते घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. तब्बल ३३ आमदार तृणमूलमध्ये परतणार असल्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वी तृणमूलचे ३३ आमदार भाजपमध्ये गेले होते. आता तितकेच आमदार पुन्हा तृणमूलमध्ये येऊ शकतात.भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेले मुकूल रॉयदेखील तृणमूलमध्ये घरवापसी करू शकतात. कधीकाळी ममता बॅनर्जींचे अतिशय निकटवर्तीय सहकारी राहिलेले रॉय निवडणूक निकालापासून शांत आहेत. त्यांचा मुलगा सुभ्रांशु रॉयनं एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यामुळे रॉयदेखील पुन्हा तृणमूलमध्ये परतू शकतात. तशी चर्चा बंगालच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची विचारपूस करण्यासाठी रॉय रुग्णालयात गेले होते. मुकूल रॉय यांच्या आईला कोरोनाची लागण झाली आहे. मुख्यमंत्री बॅनर्जींनी त्यांची विविध व्यक्तींच्या माध्यमातून विचारपूस केली आहे.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जी