West Bengal Election Opinion Poll 2026: देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून, पश्चिम बंगाल आणि असम या राज्यांतील निवडणुकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकीपूर्वी MATRIZE या संस्थेने केलेल्या ओपिनियन पोलमध्ये तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भाजपामध्ये अत्यंत चुरशीची लढत होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सर्वेनुसार TMC ला सुमारे 43 टक्के, भाजपाला 42 टक्के, तर इतर पक्षांना 16 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. MATRIZE ओपिनियन पोलनुसार पश्चिम बंगालच्या 294 विधानसभा जागांपैकी TMCला 140-160, भाजपला 130-150 आणि इतरांना 8-16 जागा मिळण्याचा अंदाज आहे. पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी 148 जागा आवश्यक आहेत. त्यामुळे कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल की नाही, याबाबत अनिश्चितता असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
नवीन राजकीय समीकरणे
यंदाच्या निवडणुकीत काही नवीन राजकीय समीकरणे तयार झाली आहेत. TMC मधून बाहेर पडलेले हुमायूं कबीर यांनी आम जनता उन्नयन पार्टी नावाचा नवीन पक्ष स्थापन केला असून, असदुद्दीन ओवेसी यांच्या AIMIM सोबत युती केली आहे. मुस्लिम बहुल मतदारसंघांमध्ये ही युती TMC ला आव्हान देऊ शकते, तर याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपाला होऊ शकतो. म्हणूनच अनेक मतदारसंघांमध्ये BJP आणि TMC यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे.
2021 च्या निवडणुकीचा निकाल
2021 मध्ये पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यांत निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली TMC ने मोठा विजय मिळवला होता. त्यावेळी TMC ला 215, भाजपला 77, तर इतरांना 2 जागा मिळाल्या होत्या. TMC ला त्या वेळी सुमारे 48% मते मिळाली होती. यंदा मात्र, भाजप आणि टीएमसीमध्ये 'काटे की टक्कर' पाहायला मिळणार आहे.
Web Summary : West Bengal's upcoming election shows a tight race. Opinion polls suggest TMC with 43% and BJP with 42% of votes. New alliances could impact results, making a clear majority uncertain. 2021 saw TMC win, but this year promises a closer contest.
Web Summary : पश्चिम बंगाल चुनाव में कांटे की टक्कर। ओपिनियन पोल के अनुसार टीएमसी को 43% और बीजेपी को 42% वोट मिलने की संभावना है। नए गठबंधनों से परिणाम प्रभावित हो सकते हैं, जिससे बहुमत अनिश्चित है। 2021 में टीएमसी जीती, लेकिन इस साल मुकाबला कड़ा होगा।