शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

जळत्या चितेतून पडू लागल्या 500-500 च्या नोटा; उशीतून रहस्य उलगडलं, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 13:25 IST

एका व्यक्तीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी चितेतून पैसे पडू लागल्याने गोंधळ उडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पश्‍चिम बंगालमधील उत्तर 24 परगना जिल्ह्यात एका व्यक्तीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी चितेतून पैसे पडू लागल्याने गोंधळ उडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकांनी लगेचच आग विझवली आणि नंतर कुटुंबीयांनी पैसे बाहेर काढले. मृत व्यक्ती व्हॅन चालक होता. ड्रायव्हर आपले वाचवलेले पैसे उशीत ठेवायचा. याच दरम्यान, त्याचा अचानक मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी मृतदेहासह उशी ठेवली. यावेळी उशी पेटू लागल्याने त्यातून अर्धे जळालेले रुपये पडू लागले. यानंतर कुटुंबीयांनी घाईघाईने चितेतून उशी काढून नोटा जळण्यापासून वाचवल्या.

भारत-बांगलादेश सीमेजवळील बशीरहाटच्या घोजाडांगा भागातील रहिवासी निमाई सरदार याचा मृत्यू झाला. त्याला मुलं नाहीत. त्यामुळे भाचा पंचानन सरदार यााला अंत्यसंस्कार करण्यासाठी बोलावण्यात आलं. भाच्याने निमाई यांचा मृतदेह स्मशानभूमीत नेऊन अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कार करताना उशी चितेवर ठेवली होती. कुटुंबातील सदस्यांना 500 रुपयांच्या अनेक नोटा दिसल्या.

लोकांना उशीच्या आतमध्य़े एक पिशवी दिसते. आगीतून पिशवी बाहेर काढली. त्यातून 500 रुपयांच्या नोटांचे बंडल बाहेर आले. ते पैसे कोणत्याही बँकेत अदलाबदल होऊ शकत नव्हते. नंतर निमाईचा भाचा पंचानन याला हाबरा येथे एक व्यक्ती सापडली. तो व्यक्ती जळालेले पैसे बदलून देतो असं समजलं. त्यानंतर पंचानन पैसे घेऊन हबरा येथे आला.

पंचाननने खोकन घोष नावाच्या व्यक्तीचा शोध घेतला. जळालेल्या 16 हजारांच्या नोटांंच्या बदल्यात खोकनने पंचाननला 7 हजार 150 रुपये दिले. भाच्याने सांगितलं की तो व्हॅन चालवायचा, पण त्याने इतके पैसे वाचवले हे आमच्यापैकी कोणालाच माहीत नव्हतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :MONEYपैसा