पश्चिम बंगालचे मंत्री मदन मित्र यांना अटक
By Admin | Updated: December 14, 2014 13:49 IST2014-12-13T02:50:37+5:302014-12-14T13:49:46+5:30
कोटय़वधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणोने (सीबीआय) शुक्रवारी प. बंगालचे परिवहन व क्रीडामंत्री मदन मित्र यांना अटक केली.

पश्चिम बंगालचे मंत्री मदन मित्र यांना अटक
शारदा घोटाळा : साडेपाच तास चौकशी
कोलकाता : कोटय़वधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणोने (सीबीआय) शुक्रवारी प. बंगालचे परिवहन व क्रीडामंत्री मदन मित्र यांना अटक केली. सीबीआयने तृणमूल काँग्रेसचे नेते असलेल्या मित्र यांची साल्टलेक परिसरातील कार्यालयात साडेपाच तास कसून चौकशी केली. या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. ही बाब तृणमूलसाठी चिंतेची असली तरी ही अटक राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे या पक्षाचे म्हणणो आहे.
मित्र यांना शारदा रियॅलिटिशी निगडित एका प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर ष्यंत्र रचणो, पैशाची अनियमितता व बेकायदेशीर आर्थिक लाभ घेण्याचे आरोप लावण्यात आले आहेत.
सीबीआयने सुदीप्त सेन व शारदा समूहाचे कायदेविषयक सल्लागार नरेश बलोडिया यांना अटक केली. याआधी कुणाल घोष व श्रुंजय बोस यांनाही याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.
- या अटकेबाबत प्रतिक्रिया देताना राज्यमंत्री सुब्रत मुखर्जी यांनी भाजपा सूडाचे राजकारण करीत असल्याचे मत व्यक्त केले आहे. एका कॅबिनेट मंत्र्याला अटक करण्याआधी राज्य सरकार व विधानसभेच्या अध्यक्षांना अंधारात कसे ठेवले जाऊ शकते असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
(वृत्तसंस्था)