शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"जेव्हा भाजप सरकार जाईल, तेव्हा...!" वक्फ विधेयकावरून ममता बॅनर्जी यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 18:07 IST

ममता म्हणाल्या, "भाजपने देशाचे विभाजन करण्यासाठी वक्फ (सुधारणा) विधेयक आणले आहे. जेव्हा भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार जाईल आणि नवीन सरकार स्थापन होईल, तेव्हा..."

वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. यानंतर गुरुवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी एक मोठी घोषणा केली. "भाजपने देशाचे विभाजन करण्यासाठी वक्फ (सुधारणा) विधेयक आणले आहे. जेव्हा भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार जाईल आणि नवीन सरकार स्थापन होईल, तेव्हा हे विधेयक रद्द करण्यासाठी वक्फ विधेयकात सुधारणा केले जाईल," असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहेलोकसभेत तृणमूल काँग्रेसने विधेयकाच्या विरोधात मतदान केले. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी वक्फ सुधारणा विधेयक, २०२५ हे राज्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण आहे. संसदेला यासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार नाही असा दावा त्यांनी केला आहे. सभागृहात विधेयकावरील चर्चेत भाग घेताना बॅनर्जी म्हणाले, मुस्लिमांचा त्यांच्या मालमत्तेवर अधिकार आहे आणि वक्फ मालमत्ता ही मुस्लिम समुदायाची सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख आहे.

विधेयकाला विरोध करत ते म्हणाले, "असे कायदे करण्याचा अधिकार केवळ राज्यांना आहे. हे विधेयक पूर्णपणे असंवैधानिक आहे. संवैधानिक तरतुदी संसदेला असे विधेयक मांडण्याचा अधिकार देत नाहीत. संसदेच्या माध्यमातून राज्य विधिमंडळाच्या अधिकारांवर, अशा प्रकारे अतिक्रमण करता येणार नाही.

मोदी सरकारने लोकसभेत वक्फ विधेयक मंजूर करून घेतले आहे. बुधवारी दुपारी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत ते सादर केले, ज्यावर १२ तास चर्चा झाली. एनडीएच्या खासदारांनी विधेयकाला पाठिंबा दिला, तर विरोधकांनी एकजूट दाखवत तीव्र विरोध व्यक्त केला. तथापि, रात्री उशिरा सभागृहात २८८ एनडीए खासदारांनी विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान केले आणि विधेयक मंजूर झाले. तर, २३२ खासदारांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केले. यानंतर, आता सरकारने गुरुवारी हे विधेयक राज्यसभेत आणले आहे, जेथे चर्चा सुरू आहे. 

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपा