शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
5
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
7
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
8
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
9
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
10
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
11
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
12
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
13
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
14
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
15
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
16
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
17
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
18
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
19
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
Daily Top 2Weekly Top 5

ममता बॅनर्जींची भविष्यवाणी! 2024 मध्ये भाजप सत्तेत येणार नाही; सांगितलं- कोण बनवणार सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 16:53 IST

"ममता म्हणाल्या, "2024 च्या लोकसभा निवडणुकीत जनता भाजपला केंद्रातील सत्तेतून पाय उतार करेल. भाजपने देशातील संस्था उद्ध्वस्त केल्या आहेत."

आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळणार नाही. तसेच, इतर पक्ष एकत्रित येऊन सरकार स्थापन करतील, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. त्या कोलकातामध्ये शहीद दिनाच्या रॅलीला संबोधित करत होत्या.

ममता म्हणाल्या, "2024 च्या लोकसभा निवडणुकीत जनता भाजपला केंद्रातील सत्तेतून पाय उतार करेल. भाजपने देशातील संस्था उद्ध्वस्त केल्या आहेत. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांची कसलीही भूमिका नव्हती, आज ते देशाचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करत आहेत. 2024 मध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवले जाईल. त्यांचा पराभव होईल. भाजपला स्वबळावर बहुमत मिळणार नाही, असे मी ठामपणे सांगतो."

भाजपच्या कैदेतून बाहेर पडण्याचे जनतेला आवाहन - ममता म्हणाल्या, भाजपला बहुमत मिळाले नाही, तर इतर पक्ष एकत्रित येऊन सरकार स्थापन करतील. भाजपच्या कैदेतून मुक्त व्हा. 2024 मध्ये जनतेचे सरकार आणा.' एवढेच नाही, तर बॅनर्जी यांनी, अन्नधान्य, दाळ आणि पीठासारख्या खाद्य पदार्थांच्या 25 किलोग्रॅम पेक्षा कमीच्या पॅकेट्सवर जीएसटी लावण्याच्या केंद्राच्या निर्णयाला जनविरोधी म्हटले आहे.

महाराष्ट्राप्रमाणे षडयंत्र केल्यास चोख प्रत्युत्तर मिळेल -यावेळी, भाजपला इशारा देत मुख्यमंत्री म्हणाल्या, जर भाजपने बंगालमध्ये महाराष्ट्राप्रमाणे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना चोख प्रत्युत्तर मिळेल.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल