शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal: पश्चिम बंगाल पोलिसांची मोठी कारवाई; राज्यातील विविध भागातून 200 पेक्षा जास्त जिवंत बॉम्ब जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 18:42 IST

West Bengal: पश्चिम बंगालच्या विविध भागांमधून पोलिसांना सातत्याने जिवंत बॉम्ब सापडत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी 200 पेक्षा जास्त बॉम्ब निकामी केले आहेत.

कोलकाता: पश्चिम बंगालच्या (West Bengal)  बीरभूममध्ये झालेल्या हिंसाचाराचा तपास सीबीआय करत आहे. यादरम्यान, गेल्या दोन दिवसांत राज्यात विविध भागात 200 हून अधिक जिवंत बॉम्ब सापडले आहेत. राज्यात सातत्याने बॉम्ब सापडत असल्याच्या तक्रारींनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आदेशानुसार पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर छापेमारी सुरू आहे. या क्रमात मुर्शिदाबादमधील दोन परिसरातून 41 जिवंत बॉम्ब, शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.

रविवारी सकाळी रेजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शेतजमिनीतून पोलिसांना तीन ड्रम भरुन बॉम्ब सापडले. पोलिसांनी आता संपूर्ण परिसराला वेढा घातला असून बॉम्ब शोधक पथकालाही माहिती देण्यात आली आहे. रेजीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन ड्रममध्ये 31 जिवंत बॉम्ब सापडले आहेत. बॉम्बशोधक पथकाने घटनास्थळी पोहोचून ते बॉम्ब निकामी केले आहेत. तपास अद्याप सुरू आहे.

तिकडे, शहरातील राणीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्येही एका शेतातूनही दहा जिवंत बॉम्ब जप्त केले आहेत. हे बॉम्बही बॉम्बशोधक पथकाने निकामी केले आहेत. या बॉम्बसोबत एक शटर पाइपगन आणि चार काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. शस्त्रास्त्र कायद्याप्रकरणी पोलिसांनी प्रताप मंडल नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.

बीरभूममध्ये 170 बॉम्ब सापडलेएका दिवसापूर्वीच पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील रामपुरहाटमध्ये 40 देशी बनावटीचे बॉम्ब सापडले होत. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारपासून बीरभूममधून एकूण 170 देशी बनावटीचे बॉम्ब सापडले आहेत. रामपूरहाटच्या बोगतुई गावाला लागून असलेल्या मारग्राममधील एका बांधकामाधीन इमारतीतून पोलिसांनी क्रूड बॉम्बने भरलेल्या आणखी 4 बादल्या जप्त केल्या, ज्यात सुमारे 40 बॉम्ब होते. शुक्रवारी मरग्राममधूनच 5 बादल्या क्रूड बॉम्ब जप्त करण्यात आले होते.

टीएमसी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार बीरभूम जिल्ह्यातील रामपुरहाटमध्ये टीएमसी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार उसळला होता. येथे अनेक घरांना आग लागली. या आगीत 2 मुलांसह 8 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 3 महिलांचाही समावेश होता. आता याप्रकरणी सीबीआय कारवाई करत आहे. अटक करण्यात आलेल्या 21 आरोपींविरुद्ध सीबीआयने दंगलीशी संबंधित कलमे लावली आहेत.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीBombsस्फोटकेCBIगुन्हा अन्वेषण विभाग