शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

'ते रामनवमीला दंगली घडवतील, पण...', ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 22:50 IST

ममतांनी आरोप केला की, केंद्रीय तपास संस्था टीएमसी नेत्यांना धमकावून भाजपमध्ये सामील होण्याचा दबाव टाकत आहेत.

West Bengal Loksabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचे प्रमुख नेते प्रचारसभा घेत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही आज पुरुलियामध्ये एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ईडी आणि इनकम टॅक्स भाजपचे फंडिंग बॉक्स आहेत. आमच्याकडे लक्ष्मी भंडार आहे, तर त्यांच्याकडे ईडी आणि सीबीआय भंडार आहे. केंद्रीय तपास यंत्रणा टीएमसी नेत्यांना भाजपमध्ये सामील होण्यास किंवा कारवाईला सामोरे जाण्याच्या धमक्या देतात. ईडी, सीबीआय, एनआयए आणि आयकर विभाग भाजपचे हत्यार म्हणून काम करत असल्याचा आरोप ममतांनी यावेळी केला.

रामनवमीला भाजप दंगली घडवतील...ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, 17 एप्रिल रोजी रामनवमीला भाजप जातीय दंगे भडकावण्याचा प्रयत्न करेल, पण तुम्ही कोणाच्याही बोलण्यात येऊ नका. 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. प्रभू रामाने दंगली भडकवायला सांगितले नव्हते, पण भाजपवाले तोच प्रयत्न करतील. जनतेने कोणत्याही चिथावणीला बळी पडू नये, असे आवाहन ममतांनी केले. तसेच, लोक सरकारविरोधात आंदोलन करतात, तेव्हा एनआयएला पाठवले जाते. रात्री उशिरा महिला जेव्हा घरात एकट्या असतात, तेव्हा स्थानिक पोलिसांना न कळवता भाजप एनआयए अधिकाऱ्यांना त्रास देण्यासाठी पाठवते, असा आरोपही त्यांनी केला.

बंगालमध्ये इंडिया आघाडी नाहीबंगालमध्ये इंडिया आघाडी नसल्याचेही ममतांनी स्पष्ट सांगितले. बंगालमध्ये सीपीआय(एम)-काँग्रेस-भाजप एकत्र लढत आहेत, आम्ही त्यांच्या युतीविरोधात लढत आहोत. आपल्याला टीएमसी आणखी बळकट केली पाहिजे. असे झाले नाही, तर आपल्याला माहीत आहे की, भारताचे अस्तित्व संपुष्टात येईल. आता भाजपने समान नागरी कायदा आणला, CAA देखील आणला, यामुळे लोक बेघर होतील आणि त्यांचे नागरिकत्व धोक्यात येईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाwest bengalपश्चिम बंगालLok Sabha Election Major Fightsलोकसभा निवडणूक टफ फाइट्सBJPभाजपा