शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

West Bengal Election Voting : पंतप्रधान मोदींनी आचार संहितेचं उल्लंघन केलं, ममतांचा आरोप; म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 4:42 PM

पश्चिम बंगालमध्ये मतुआ समाजाची संख्या जवळपास 2 कोटी एवढी आहे. हा समाज पश्चिम बंगालमधील मतांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे.

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसी नेत्या ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. ममता म्हणाल्या, राज्यात निवडणूक होत आहे आणि ते (पंतप्रधान मोदी) बांगलादेशात जाऊन बंगालवर व्याख्यान देत आहेत. हे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघण आहे. ममता खडगपूर येथे एका सभेला संबोधित करत होत्या.  (West Bengal Election Voting Mamata Banerjee says elections are underway here and PM Narendra Modi goes to bangladesh and lectures on bengal)

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेश दौऱ्यावर आहेत. त्यांनी शनिवारी येथील ओरकांडी येथे जाऊन मतुआ समाजाच्या प्रतिनिधींची भेट घेतली. यापूर्वी त्यांनी मतुआ समाजाच्या मंदिरात जाऊन दर्शण घेतले आणि नंतर समुदायाच्या लोकांना संबोधित केले.

मलाही अगदी 'तसेच' वाटते आहे - मोदीमतुआ समुदायाला संबोधित करताना मोदी म्हणाले, श्री श्री हरिशचंद्र ठाकूर यांच्या कृपेनेच मला ओराकान्डी ठाकूरबाडी, या पुण्यभूमीचे दर्शन करण्याचे भाग्य लाभले. मी श्री श्री हरिशचंद्र ठाकूर जी आणि श्री श्री गुरुचंद ठाकूर जी यांच्या चरणांत नतमस्कत होऊन त्यांना नमन करतो. एका व्यक्तीशी केलेल्या चर्चेचा हवाला देत मेदी म्हणाले, कुणी विचार तरी केला होता का, की एखादा भारतीय पंतप्रधान येथे येईल आणि मतुआ समाजाच्या मंदिरात पूजा करेल. भारतात राहणाऱ्या माझ्या मतुआ समाजाच्या भाऊ आणि बहिणींना ओराकांडी येथे आल्यानंतर जसे वाटते, मलाही अगदी तसेच वाटत आहे.

मोदी म्हणाले, मला आठवते, की मी पश्चिम बंगालमध्ये ठाकुरनगरमध्ये गेलो होतो. तेथील माझ्या मतुआ भाऊ-बहिणींनी मला कुटुंबातील सदस्याप्रमाणेच प्रेम दिले होते. विशेषतः ‘बॉरो-मां’चा आपलेपणा, आई प्रमाणेच त्यांचा आशीर्वाद, माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचे क्षण आहेत.

म्हणून मतुआ समाज महत्वाचा - पश्चिम बंगालमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत असतानाच पंतप्रधान मोदींनी मतुआ समाजाच्या मंदिरात पूजा केली. पश्चिम बंगालमध्ये मतुआ समाजाची संख्या जवळपास 2 कोटी एवढी आहे. हा समाज पश्चिम बंगालमधील मतांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे.

जेशोरेश्वरी काली मंदिरात जाऊन दर्शन - आज पंतप्रधान मोदींनी आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ईश्वरीपूर गावातील प्राचीन जेशोरेश्वरी काली मंदिरात जाऊनही दर्शन घेतले आणि पूजा केली. मोदींच्या बांगलादेशातील या मंदिर भेटींकडे राजकीय दृष्टीनेही पाहिले जात आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१west bengalपश्चिम बंगाल