शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीपूर्वी बंगालमध्ये वातावरण तापले; रामनवमीच्या निमित्ताने हिंदू एकत्रीकरणाचा BJPचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 21:23 IST

West Bengal Election : पुढील वर्षी होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे.

West Bengal Election : पुढील वर्षी होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजप हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणणार आहे. बांग्लादेशात हिंदूंवर होणारे अत्याचारासह निवडणुकीपूर्वी येणाऱ्या रामनवमीमुळे भाजपला बुस्टर डोस मिळण्याची शक्यता आहे. हिंदू मतांच्या एकत्रीकरणासाठी भाजप रामनवमीसह हिंदू सणांचा पुरेपूर वापर करू शकते. 

बांग्लादेशमध्ये गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या सत्तापालटानंतर हिंदूंविरुद्ध हिंसाचाराच्या घटनांमुळे आणि आता पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या निवडणुकांमुळे राज्यात रामनवमी हा सण राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा बनला आहे. राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजप यांच्यात ध्रुवीकरण आणि काउंटर ध्रुवीकरणाची शर्यत सुरू असल्याने रामनवमी उत्सवाला वेगळाच रंग प्राप्त झाला आहे.

हिंदू मतांच्या एकत्रीकरणाचा प्रयत्नपुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप हिंदू मतांचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न करत असून, पक्षाने रामनवमी उत्सवाला आपल्या प्रचाराचा महत्त्वाचा केंद्रबिंदू बनवले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि विश्व हिंदू परिषद (VHP) यांसारख्या हिंदू संघटनांनी 6 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आठवडाभर रामनवमी उत्सवासाठी राज्यातील सर्व ब्लॉकमध्ये मिरवणुका काढण्याची तयारी केली आहे. या काळात 3 कोटींहून अधिक लोक जमवण्याचे लक्ष्यही ठेवण्यात आले आहे. या मिरवणुका 'बांग्लादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांच्या घटना' आणि तृणमूल काँग्रेसच्या 'तुष्टीकरणाच्या राजकारणा'विरुद्ध प्रतीकात्मक प्रदर्शन म्हणून काम करतील.

लोकांचे डोळे उघडणणारकेंद्रीय मंत्री आणि पश्चिम बंगाल युनिटचे अध्यक्ष सुकांत मजुमदार म्हणाले की, बांग्लादेशातील हिंदूंवर होणारे हल्ले, हे सीमेच्या (भारतातील) बाजूच्या लोकांसाठी डोळे उघडणारे आहेत. जर आपण आता त्याचा प्रतिकार केला नाही, तर टीएमसीच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे पश्चिम बंगालमधील हिंदूंचीही अशीच स्थिती होऊ शकते. पश्चिम बंगालमध्येही तृणमूलने पाठिंबा दिलेल्या जिहादींकडून हिंदूंना अशाच प्रकारच्या हल्ल्यांचा सामना करावा लागू शकतो. यंदाचा रामनवमी उत्सव अशा अत्याचारांना 'उत्तर' ठरेल, असे ते म्हणाले. 

विश्व हिंदू परिषदेचे राज्य सचिव चंद्र नाथ दास म्हणाले की, महाकुंभमेळ्याला आणि अयोध्येतील राम मंदिराला भेट देणाऱ्या बंगाली भाविकांची विक्रमी संख्या, बांग्लादेशातील अत्याचाराला बळी पडलेल्या आपल्या नातेवाईकांशी अनेक हिंदूंचे भावनिक नाते आण राज्य सरकारच्या तुष्टीकरणाच्या धोरणांविरुद्ध राज्यात वाढत असलेला असंतोष, यामुळे यंदाच्या रामनवमीने लोकांना आपला संताप आणि निषेध व्यक्त करण्याची संधी दिली आहे.

रामनवमीच्या दिवशी राज्यात जातीय संघर्ष वाढणारटीएमसीचे खासदार सौगता रॉय यांनी मतदारांच्या ध्रुवीकरणाचा आरोप करत भाजपवर टीका केली. भाजप पश्चिम बंगालमधील जातीय सलोखा बिघडवण्यासाठी जाणूनबुजून धार्मिक सणांचा वापर केला जातोय. भाजपच्या लोकांना निवडणुकीपूर्वी लोकांमध्ये फूट पाडायची आहे, असा आरोप त्यांनी केला. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाBJPभाजपा