शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

West Bengal Election : रूग्णालयातून ममता बॅनर्जींनी जारी केला व्हिडीओ; म्हणाल्या, "आता व्हिलचेअरवरून प्रचार करणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 16:00 IST

west bengal election 2021 : गुरूवारी प्रचारादरम्यान ममता बॅनर्जींच्या पायाला झाली दुखापत, रुग्णालयात करण्यात आलं दाखल

ठळक मुद्देगुरूवारी प्रचारादरम्यान ममता बॅनर्जींच्या पायाला झाली दुखापतसध्या त्यांच्यावर रुग्णालयात सुरू आहेत उपचार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निवडणूक प्रचारादरम्यान पायाला आणि मानेला दुखापत झाली होती. दरम्यान, आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला होता. त्यानंतर सध्या ममता बॅनर्जी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीत ममता बॅनर्जी यांनी रुग्णालयातूनच एक व्हिडीओ जारी केला आहे. तृणमूल काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरू हा व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. या व्हिडीओद्वारे ममता बॅनर्जी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांतता कायम ठेवण्याचं आवाहन केलं आहे. तसंच दुखापत झाल्यानंतर आपलं काम बाधित होणार नाही आणि आपण व्हिलचेअरवरून प्रचार करणार असल्याचंही त्यांनी व्हिडीओद्वारे सांगितलं. "मला पुढचे काही दिवस व्हिलचेअरवरच राहावं लागेल. असं असलं तरी मी निवडणूक प्रचाराता बाधा येऊ देणार नाही. मी व्हिलचेअरवरच प्रचार करणार," असं त्या म्हणाल्या.ममता बॅनर्जी यांना रोखण्यासाठी काही पळपुट्या लोकांनी अशी कृती केली. परंतु या कृतीत कोणीही यशस्वी होऊ शकणार नाही. ममता बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्या हे एक षडयंत्र आहे, असं मत पक्षाचे नेते पार्थ चटर्जी यांनी म्हटले. ममता बॅनर्जी यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जी यांचा रुग्णालयामधील फोटो ट्वीट करत भाजपाला इशारा दिला आहे. भाजपाने तयार रहावं. रविवारी २ मे रोजी त्यांना बंगालच्या लोकांची ताकद दिसणार असल्याचंही ते म्हणाले. ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला कसा झाला?या निवडणुकीच्या रणधुमाळीत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरूवारी नंदीग्राम मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरला. यानंतर ममता बॅनर्जी नंदीग्राम येथे एका मंदिरात पूजेसाठी गेल्या होत्या. मंदिरातून बाहेर परतल्यानंतर त्या गाडीत बसण्यासाठी जात होत्या. यावेळी त्या गाडीत शिरताना चार-पाच लोकांनी जोरात गाडीचा दरवाजा ढकलला. यावेळी, ममता बॅनर्जी यांना गंभीर दुखापत झाली, असा दावा त्यांच्याकडून करण्यात येत आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांच्या डाव्या पायाला प्लास्टर करण्यात आले आहे.पश्चिम बंगालची निवडणूक हायव्होल्टेज ठरणार दरम्यान, देशात पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. परंतू सर्वात हायव्होल्टेज निवडणूक ही पश्चिम बंगालची ठरणार आहे. याठिकाणी भाजपाला काहीही करून पश्चिम बंगालची सत्ता मिळवायची आहे, तर तृणमूल काँग्रेसला काहीही करून सत्ता टिकवायची आहे. यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाBJPभाजपाTwitterट्विटर