शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना
2
चाबहार बंदर, वाघा बॉर्डर आणि..; भारत-अफगाणिस्तानात 'या' मुद्द्यांवर चर्चा, मुत्ताकी यांची माहिती
3
अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार; तालिबान सरकारने ISIS बद्दल काय सांगितलं?
4
संतापजनक! बहिणीला भेटायला चाललेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर रस्त्यातच सामूहिक बलात्कार
5
AI नाही, भारतीयांच्या टॅलेंटची कमाल! या तरुणाच्या क्रिएटिव्हिटीने लावले सर्वांना वेड; व्हिडीओ एकदा बघा
6
'मुलींनी रात्री बाहेर पडू नये', दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य
7
घरात घुसली ८ फूट लांब आणि ८० किलोंची मगर; पठ्ठ्याने एकट्यानेच नेली उचलून
8
धक्कादायक! कपडे उतरवून पोलिसांनी हैवानासारखं मारलं, धमन्या फुटल्या; तरुणाचा मृत्यू
9
'वनडे क्वीन' स्मृतीनं रचला नवा इतिहास; ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विरुद्ध साधला मोठा डाव
10
“कोकणाच्या भूमीतील या न्याय मंदिरातून स्थानिकांना जलद गतीने न्याय मिळेल”: एकनाथ शिंदे
11
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
12
गृह कर्जाचा हप्ता भरणं जड जातंय? ईएमआय कमी करण्यासाठी 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा आणि मोठी बचत करा!
13
“दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील, पालकमंत्रीपद...”; गिरीश महाजनांचा टोला
14
अर्धा संघ तंबूत धाडत कुलदीप यादवनं रचला इतिहास; दिल्लीच्या मैदानात मारला विश्वविक्रमी 'पंजा'
15
तुम्हालाही मस्त नेलपेंट लावायला आवडते? ठरेल जीवघेणं, वाढू शकतो स्किन कॅन्सरचा धोका
16
तुम्हीही होऊ शकता कोट्यधीश! विद्यार्थी, गिग वर्कर्ससाठी 'मायक्रो SIP' चा नवा सुपरहिट ट्रेंड
17
"जर तुम्ही कॉफी बनवायला शिकला असाल तर...", राहुल गांधींच्या दक्षिण अमेरिका दौऱ्यावर भाजपचा निशाणा
18
“तरे म्हणाले होते हा माणूस दगा देईल, तेच झाले, आता पश्चाताप झाला नसता”; ठाकरेंची शिंदेवर टीका
19
नोकरीच्या बचतीची चिंता सोडा! 'या' ४ सोप्या मार्गांनी घरबसल्या तपासा तुमचा PF बॅलन्स
20
Pune Crime: गर्लफ्रेंडच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबतचे नग्न फोटो, बॉयफ्रेंडने केक कापायच्या चाकूनेच तरुणीची हत्या

'मुलींनी रात्री बाहेर पडू नये', दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 15:32 IST

West Bengal Crime: पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथील एका खासगी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे.

West Bengal Crime:पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथील एका खासगी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेने सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमने-सामने आले आहेत. अशातच, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणावर बोलताना केलेल्या एका वाद वाढण्याची शक्यता आहे. 

ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य

रविवारी उत्तर बंगाल दौर्‍यावर रवाना होण्यापूर्वी कोलकाता विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ही घटना अतिशय भयावह आहे. पण, आता प्रश्न असा पडतो की, घटना घडली, तेव्हा कॉलेज प्रशासन कुठे होते? तरुणी रात्री एवढ्या उशिरा बाहेर कशी गेली? ती बाहेर काय करत होती? मुलींनी रात्री बाहेर पडू नये. कॉलेजनेही जबाबदारी घ्यावी लागेल, असे वक्तव्य ममता बॅनर्जींनी केले आहे. या वाक्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

तसेच त्यांनी पुढे असेही म्हटले की, आम्ही पोलिसांना कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. कोणत्याही आरोपीला सोडले जाणार नाही. पोलीस सर्व संबंधितांची चौकशी करत आहेत. दोषींना कठोर शिक्षा होईल. मात्र, त्यांच्या “मुलींनी रात्री बाहेर जाऊ नये” या विधानावर अनेक महिला संघटनांनी टीका केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, अशा वक्तव्यांनी पीडितांनाच दोषी ठरवण्याची प्रवृत्ती वाढते.

ममता बॅनर्जींची इतर राज्यांवर टीका

ममतांनी या संदर्भात ओडिशाचा उल्लेख करत प्रश्न उपस्थित केला की, तीन आठवडेपूर्वी ओडिशातील समुद्रकिनाऱ्यावर तीन मुलींवर बलात्कार झाला होता. तिथे सरकार काय करतंय? आम्ही आमच्या राज्यात आरोपींवर एका-दोन महिन्यांत आरोपपत्र दाखल करून न्यायालयाकडून फाशीची शिक्षा मिळवली. मग इतर राज्यांनी असे का नाही केले? मणिपूर, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, अशा अनेक ठिकाणी बलात्काराच्या घटना घडतात, पण तिथल्या सरकारांची प्रतिक्रिया मंद असते. आम्ही मात्र तत्काळ कारवाई करतो.

नेमकी काय घटना घडली?दुर्गापूरमधील एका खासगी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीवर शुक्रवारी रात्री सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडित तरुणी आपल्या मैत्रिणीसोबत जेवायला बाहेर गेली होती. या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Mamata Banerjee's controversial statement: 'Girls shouldn't go out at night'.

Web Summary : West Bengal CM Mamata Banerjee faces backlash for suggesting the Durgapur gangrape victim shouldn't have been out late. She emphasized college responsibility and swift police action, contrasting her state's response with other states.
टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारी