या दोन पैकी एका मैदानावर वर्ल्ड कपचा अंतिम सामना झाला असता, तर भारत जिंकला असता; ममतांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 04:02 PM2023-11-23T16:02:29+5:302023-11-23T16:03:53+5:30

19 नोव्हेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादमध्ये हा अंतिम सामना खेळला गेला होता.

West bengal CM Mamta Banerjee slams narendra modi for world cup defeat | या दोन पैकी एका मैदानावर वर्ल्ड कपचा अंतिम सामना झाला असता, तर भारत जिंकला असता; ममतांचा दावा 

या दोन पैकी एका मैदानावर वर्ल्ड कपचा अंतिम सामना झाला असता, तर भारत जिंकला असता; ममतांचा दावा 

विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात झालेल्या भारताच्या पराभवानंतर, आता राजकीय वातावरणही तापले आहे. राजस्थानातील एका निवडणूक कार्यक्रमात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पीएम चा अर्थ 'पनौती मोदी' असल्याचे म्हटले होते. यानंतर आता तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही निशाणा साधला आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना कोलकाता अथवा मुंबईत खेळवला गेला असता तर भारत जिंकला असता, असे त्यांनी म्हटले आहे. 19 नोव्हेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादमध्ये हा अंतिम सामना खेळला गेला होता.

खेळाडूंनी भगव्या जर्सीला विरोध केल्यानंतर... -
यावेळी ममता बॅनर्जी यांनी भगव्या जर्सीवरही भाष्य केले. त्या म्हणाल्या, खेळाडूंनी भगव्या जर्सीला विरोध केल्यानंतर त्याचा परिणामही दिसून आला. यामुळे, भारतीय संघालाय भगव्या रंगाची जर्सी घालावी लागली नाही. भाजप प्रत्येक गोष्टीकडे राजकीय चष्म्यातून बघते आणि त्याचा  नकारात्मक परिणामही  दिसून येतो.  

तत्पूर्वी, ममता बॅनर्जी यांनी सराव सत्रादरम्यान भारतीय संघाने परिधान केलेल्या जर्सीवरून प्रश्न उपस्थित केला होता. खेळाडूंनी भगव्या रंगाची जर्सी का परिधान केली, हे समजण्या पलिकडे आहे. यासाठी त्यांनी भाजपला जबाबदार धरले होते. एवढेच नाही, तर भाजपच्या लोकांना प्रत्येक गोष्टीचे भगवेकरण करायचे आहे, असेही ममता यांनी म्हटले होते.

आणखी तीन महिने राहणार हे सरकार - 
हे सरकार आणखी तीन महिने केंद्रात राहील, असे म्हणत, गोवंश तस्करीचा मुद्दाही ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला. बांगलादेशात तस्करीसाठी वेगवेगळ्या राज्यांतून गायी आणल्या जातात. प्रश्न असा आहे की, तेथे "पैसे" कोण घेते? देशातील बँकिंग क्षेत्रात निराशेचे वातावरण आहे, सार्वजनिक उपक्रम (पीएसयू) विकले जात आहेत. कोलकात्याच्या 'सिलिकॉन व्हॅली' प्रकल्पात सर्व मोठ्या आयटी कंपन्या गुंतवणूक करत आहेत. खरे तर, धोकादायक वाटणाऱ्या सर्व लोकांना बदनाम करण्याची भाजपला सवय झाली आहे. केवळ मोठ-मोठ्या गप्पा मारून काही उपयोग नाही. एकीकडे भाजप आपल्या यशाचे ढोल वाजवत आहे, तर दुसरीकडे जनतेला जमिनीवर अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, नरेंद्र मोदी यांच्या सरकारला याची कसलीही काळजी नाही, असेही ममतांनी म्हटले आहे.
 

Web Title: West bengal CM Mamta Banerjee slams narendra modi for world cup defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.