शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे अच्छे दिन संपले; त्यांची एक्स्पायरी डेट जवळ आली- ममता बॅनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 17:19 IST

महारॅलीच्या व्यासपीठावरुन ममता बॅनर्जींचं मोदी सरकारवर शरसंधान

कोलकाता: मोदी सरकारचे अच्छे दिन यापुढे येणार नाहीत. त्यांची एक्स्पायरी डेट आता जवळ आली आहे, अशा शब्दांमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनीभाजपावर निशाणा साधला. मोदी सरकारच्या विरोधात आज तृणमूल काँग्रेसनं कोलकात्यात महारॅलीचं आयोजन केलं. या महारॅलीला 22 पक्षांचे नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना ममता बॅनर्जींनी मोदी सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. महारॅलीच्या निमित्तानं आज मंचावर संयुक्त भारताचं उत्तम उदाहरण आहे. लवकरच देशात एक नवी पहाट उगवली, असा विश्वास तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींनी व्यक्त केला. 'मोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आली आहे. येणाऱ्या काळात आपण एकत्र काम करू. यापुढे भाजपाचे अच्छे दिन येणार नाहीत. त्यांनी कितीही आश्वासनं दिली तरी त्यांचे अच्छे दिन पुन्हा येणार नाहीत,' अशा शब्दांमध्ये ममता बॅनर्जींनी मोदी सरकारवर शरसंधान साधलं.येणाऱ्या काळात विरोधकांनी एकजूट दाखवावी. जिथे जो पक्ष मजबूत असेल, तिथे इतर पक्षांनी त्याला साथ द्यावी, असं आवाहन त्यांनी केलं. रथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही, असं म्हणत त्यांनी भाजपाला इशारा दिला. भाजपा पश्चिम बंगालमध्ये यशस्वी होणार नाही. त्यांना फक्त भोपळाच असेल, असा टोला बॅनर्जींनी लगावला. मोदींनी देशातील सर्व संस्था उद्ध्वस्त केल्या आहेत. त्यांना वाटतं फक्त तेच प्रामाणिक आहेत. मात्र येणाऱ्या दिवसात महाआघाडी त्यांच्यासमोर आव्हान उभं करेल, असं त्यांनी महारॅलीला संबोधित करताना म्हटलं.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा