शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

West Bengal CBI Updates: मंत्र्यांवरील कारवाईनंतर बंगालमध्ये सीबीआय-तृणमूलमध्ये जोरदार संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 05:45 IST

कार्यकर्त्यांकडून सीबीआय कार्यालयावर दगडफेक

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये काही वर्षांपूर्वी उघडकीस आलेल्या नारदा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील दोन मंत्री आणि तृणमूलच्या अन्य दोन नेत्यांना अटक केल्यानंतर एकच खळबळ उडाली. यानंतर संतप्त झालेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी थेट सीबीआयच्या कार्यालयात धडकल्या तर बाहेर गोळा झालेल्या तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयावर दगडफेक केली. अटक केलेल्या चारही नेत्यांची विशेष सीबीआय कोर्टाने संध्याकाळी जामीनावर सुटका केली परंतु कोलकाता हायकोर्टाने या  निर्णयाला स्थगिती दिल्याने या नेत्यांना १९ मे पर्यंत सीबीआयच्या कोठडीत राहावे लागणार आहे. या नेत्यांच्या सुटकेसाठी तृणमूलचे कार्यकर्ते सीबीआय कार्यालय व कोर्टाबाहेर ठाण मांडून होते. 

सीबीआय अधिकाऱ्यांनी सोमवारी फिरहाद हकीम आणि सुब्रत मुखर्जी या मंत्र्यांसह तृणमूलचे आ. मदन मित्रा तसेच कोलकात्याचे माजी महापौर सोवन चॅटर्जी यांना अटक केली. राज्यपाल जगदीप धनकड यांनी मंत्री तसेच आमदारांच्या अटकेला मंजुरी दिली होती. 

राजभवनाबाहेर निदर्शने या प्रकारानंतर राज्यपाल धनकड यांनी ट्विट करून राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे म्हटले. या ट्विटनंतर राजभवनाबाहेरही तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. तर मंत्र्यांच्या अटकेनंतर राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचार उफा‌ळला. ममता बॅनर्जी यांनीच हिंसाचाराला चिथावणी दिल्याचा आरोप करून भाजपचे खा. दिलीप घोष यांनी तक्रार दाखल केली. 

अधिकाऱ्यांना सुनावलेविधानसभा अध्यक्ष व राज्य सरकारच्या परवानगीशिवाय अशी कारवाई करता येत नसल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्यांना ममता बॅनर्जी यांनी सुनावले. बेकायदा कारवाई करणाऱ्यांवर कारवाईची मागणी तृणमूलच्या नेत्यांनी कोलकाता पोलिसांकडे केली.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागwest bengalपश्चिम बंगालtmcठाणे महापालिका