शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

भवानीपूरमध्ये ममतांना मोठी टक्कर; भाजपनं तब्बल 80 नेत्यांना उतरवलं मैदानात; TMC नंही झोकली संपूर्ण ताकद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 10:35 IST

याशिवाय अर्जुन सिंह आणि स्वप्न दासगुप्ता यांचाही यात सहभाग आहे. येथे 30 सप्टेंबरला पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2011 आणि 2016 मध्ये येथूनच निवडणूक जिंकली होती. भवानीपूर मतदार संघ हा ममता बॅनर्जींचा जुनाच मतदारसंघ आहे.

कोलकाता - पश्चिम बंगालमधील भवानीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. या जागेसाठी आज तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी आपली संपूर्ण ताकद झोकून दिली आहे. या विधानसभा मतदारसंघात ममता बॅनर्जी आपल्या समर्थकांसह प्रचारासाठी रस्त्यावर उतरणा आहेत. तर भाजपचे 80 नेते पक्षाच्या उमेदवार प्रियांका टिबरेवाल यांच्या प्रचारासाठी 80 ठिकाणी मैदानात उतरणार आहेत. पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी, प्रदेश भाजप प्रमुख सुकांता मजुमदार, पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष आणि पक्षाच्या नेत्या देबश्री चौधरी हे देखील मैदानात उतरणार आहेत.

याशिवाय अर्जुन सिंह आणि स्वप्न दासगुप्ता यांचाही यात सहभाग आहे. येथे 30 सप्टेंबरला पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2011 आणि 2016 मध्ये येथूनच निवडणूक जिंकली होती. भवानीपूर मतदार संघ हा ममता बॅनर्जींचा जुनाच मतदारसंघ आहे.

"मोदींपेक्षा अधिक लोकप्रिय ममता बॅनर्जी, अनेक राज्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाविरोधात लढण्यास तयार"

नंदीग्राम मतदार संघात झाला होता ममतांचा पराभव - याचवर्षी एप्रिल-मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढली होती. यासाठी त्यांनी आपला पारंपरिक भवानीपूर मतदारसंघ सोडला होता. मात्र, नंदीग्राममध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. येथे सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला. यापूर्वी सुवेंदू अधिकारी टीएमसीमध्येच होते.

ममता बॅनर्जींना 5 नोव्हेंबरपर्यंत जिंकून विधानसभेत पोहोचणे आवश्यक -दरम्यान, ममता बॅनर्जींना मुख्यमंत्री पदावर टिकून राहण्यासाठी ही पोटनिवडणूक जिंकणे आवश्यक आहे. नंदीग्राममध्ये सुवेंदू अधिकारी यांच्याकडून पराभूत होऊन मुख्यमंत्री झालेल्या ममता बॅनर्जी यांना ५ नोव्हेंबरपर्यंत आमदार होणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल. ममता बॅनर्जी यांनी नंदीग्रामच्या निवडणूक निकालाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र, यावर पुढील सुनावणी १५ नोव्हेंबरला होणार आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाBJPभाजपाMLAआमदार