पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेत्याच्या घरावर हल्ला
By Admin | Updated: January 5, 2017 02:53 IST2017-01-05T02:53:46+5:302017-01-05T02:53:46+5:30
भाजपाच्या कोलकात्यातील मुख्यालयावर मंगळवारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर हुगली जिल्ह्यातील पक्षाच्या राज्य

पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेत्याच्या घरावर हल्ला
हुगली : भाजपाच्या कोलकात्यातील मुख्यालयावर मंगळवारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर हुगली जिल्ह्यातील पक्षाच्या राज्य महासचिव कृष्णा भट्टाचार्य यांच्या घरावर रात्री बॉम्बने हल्ला करण्यात आला. चिटफंड घोटाळाप्रकरणी तृणमूलचे खासदार सुदीप बंदोपाध्याय यांना अटक झाल्यानंतर या घटना घडत आहेत.
चेहरा झाकलेले तीन लोक रात्री नऊच्या सुमारास दुचाकीवर कृष्णा यांच्या कोन्नानगर जोरापुकुर घाट येथील निवासस्थानी पोहोचले आणि बॉम्ब फेकले. तृणमूल काँग्रेसने पोसलेल्या समाजकंटकांचे हे कृत्य असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांना उपचारासाठी उत्तरपारा प्रदेश जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेत आमचा संबंधा नाही, असे तृणमूलचे नेते तपन दासगुप्ता यांनी सांगितले. चिटफंड घोटाळाप्रकरणी तृणमूलचे खासदार सुदीप बंदोपाध्याय यांना अटक झाल्याच्या निषेधार्थ मंगळवारी भाजप मुख्यालयावर दगडफेक करण्यात आली. (वृत्तसंस्था)