शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

West Bengal Assembly Election: आज मतदानाचा ‘खेला होबे’; पहिल्या टप्प्यात ३० जागांचा समावेश; तृणमूल-भाजपमध्ये मुख्य लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 6:11 AM

पहिल्या टप्प्यात पुरुलिया व झारग्राम येथील सर्व मतदारसंघ तसेच बांकुरा, पूर्व मेदिनीपूर व पश्चिम मेदिनीपूरमधील काही मतदारसंघांचा समावेश आहे.

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचे मतदान शनिवारी होणार आहे. या टप्प्यात ३० जागांचा समावेश असून सत्ताधारी तृणमूल काँग्रेस व भाजप यांच्यात मुख्य लढत असल्याचे मानले जात आहे. काँग्रेस व डाव्यांच्या आघाडीचेदेखील आव्हान राहणार आहे.

पहिल्या टप्प्यात पुरुलिया व झारग्राम येथील सर्व मतदारसंघ तसेच बांकुरा, पूर्व मेदिनीपूर व पश्चिम मेदिनीपूरमधील काही मतदारसंघांचा समावेश आहे. सर्व पक्ष व अपक्षांचे मिळून एकूण १९१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात २१ महिलादेखील आहेत. २०१६ च्या विधानसभा निवडणुकात या ३० जागांपैकी २७ ठिकाणी तृणमूलचे उमेदवार विजयी झाले होते. निवडणूक सुरळीतपणे पार पडावी यासाठी मतदान केंद्रांवर सीएपीएफच्या ६५९ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

क्रांतिकारी गाण्याची धूम; भाजपविरोधात एकवटले कलाकार

  • एकीकडे पश्चिम बंगालमध्ये भाजपने काही अभिनेत्यांना रिंगणात उतरवले असताना दुसरीकडे भाजपच्या अजेंड्याविरोधात एका गाण्याने धूम केली आहे. बंगालमधील विविध कलाकार या गाण्याच्या माध्यमातून भाजपविरोधात एकत्र आले आहे. 
  • ‘आम्ही ओन्यो कोठाओ जाबोना...’ म्हणजेच आम्ही कुठेही जाणार नाही, आम्ही याच देशाचे आहोत, असा संदेश या माध्यमातून देण्यात येत आहे. भाजपच्या ‘सीएए’च्या भूमिकेला आव्हान देण्यात आले.
  • बंगालमधील अभिनेते अनिर्बान भट्टाचार्य यांनी लिहिलेल्या गाण्यावर हा व्हिडिओ चित्रित करण्यात आला असून ‘सोशल मीडिया’वर तो खूप ‘व्हायरल’ झाला आहे. बुधवारी एका ‘फेसबुक पेज’वर हा ‘व्हिडिओ’ पोस्ट करण्यात आला. 
  • यात रुद्रप्रसाद चक्रवर्ती, अनिन्द्य मुखोपाध्याय, सुमन मुखोपाध्याय, कौशिक सेन, अनुपम रॉय, रुपंकर बागची यांच्यासह २० हून अधिक अभिनेते, अभिनेत्री, संगीतकार, गायक यांचा समावेश आहे. 

केंद्र सरकारचे ‘रिपोर्ट कार्ड’ : या व्हिडिओच्या माध्यमातून केंद्र सरकारचे मागील सहा वर्षातील रिपोर्ट कार्ड मांडण्यात आल्याचे दिग्दर्शिका व अभिनेत्री रिद्धी सेन यांनी सांगितले. यात सहा वर्षातील वादग्रस्त मुद्द्यांना स्पर्श करण्यात आला आहे. तुकडे तुकडे गँग, अँटी नॅशनल्स, गो टू पाकिस्तान, महिला सुरक्षा यासारख्या मुद्यांनादेखील यातून स्पर्श करण्यात आला आहे. सोबत ‘सीएए’विरोधातदेखील अप्रत्यक्षपणे भूमिका मांडण्यात आली आहे.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Votingमतदान