संपूर्ण देशभरातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीमुळे आता राज्यातील वातावरण तापू लागलं आहे. येथे सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्येच खरी लढत आहे. तर स्वबळावर लढत असलेल्या काँग्रेसनेही काही ठिकाणी आव्हान उभं केलं आहे. त्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीररंजन चौधरी यांचं प्रभावक्षेत्र असलेल्या बहरामपूर आणि आजूबाजूच्या प्रदेशाचा समावेश आहे. दरम्यान, आज अधीर रंजन चौधरी हे या भागात प्रचार करत असताना तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. तसेच तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले. तसेच पोलिसांसमोरच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार शनिवारी सकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बहरामपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अधीर रंजन चौधरी हे आपल्या समर्थकांसह बहरामपूरमधील प्रभाग क्रमांक १९ मध्ये प्रचार करत होते. तेवढ्यात येथे तृणमूल काँग्रेसचे नगरसेवक भीष्मदेव करमाकर काही कार्यकर्त्यांसह तिथे पोहोचले. तसेच त्यांनी अधीररंजन चौधरी यांना प्रचार करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काँग्रेस आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की आणि हाणामारी झाली.
माजी खासदार असलेल्या अधीर रंजन चौधरी यांना काँग्रेसने बहरामपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. अधीर रंजन चौधरी यांनी पहिल्यांदा मुर्शिदाबादमधील नबग्राम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर १९९६ मध्ये ते इथून विजयी झाले होते. पुढे बहरामपूर विधानसभा मतदारसंघातून अधीर रंजन चौधरी यांनी सलग पाच वेळा विजय मिळवला होता. मात्र २०२४ मध्ये त्यांना या मतदारसंघात माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
Web Summary : West Bengal's political temperature rises as Congress leader Adhir Ranjan Chowdhury faces attack during campaigning. TMC activists allegedly tried to stop him, leading to clashes with Congress supporters. Police intervened amidst heightened tensions in Baharampur.
Web Summary : पश्चिम बंगाल में कांग्रेस नेता अधीर रंजन चौधरी के प्रचार के दौरान हमला हुआ। टीएमसी कार्यकर्ताओं ने कथित तौर पर उन्हें रोकने की कोशिश की, जिससे कांग्रेस समर्थकों के साथ झड़प हुई। बहरामपुर में तनाव के बीच पुलिस ने हस्तक्षेप किया।