शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
5
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
6
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
9
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
10
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
11
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
12
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
13
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
14
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
15
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
16
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
17
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
18
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
19
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
20
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त

सौरव गांगुली PM मोदींच्या रॅलीतून राजकीय इनिंग सुरू करणार?; भाजपने केले स्पष्ट

By देवेश फडके | Updated: March 3, 2021 08:51 IST

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांच्या (West Bengal Assembly Election 2021) तारखा जाहीर झाल्यानंतर तेथील रणधुमाळी आता अधिक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. ममता बॅनर्जी यांचे सरकार खालसा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) आपली राजकीय इनिंग सुरू करणार असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीत सौरव गांगुली सहभागी होतील, असे म्हटले जात आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीत सौरव गांगुली सहभागी होणारभाजप प्रवक्त्यांनी केले स्पष्टसौरव गांगुली यांच्या नव्या राजकीय इनिंगची सर्वत्र चर्चा

कोलकाता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांच्या (West Bengal Assembly Election 2021) तारखा जाहीर झाल्यानंतर तेथील रणधुमाळी आता अधिक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. ममता बॅनर्जी यांचे सरकार खालसा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) आपली राजकीय इनिंग सुरू करणार असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या रॅलीत सौरव गांगुली सहभागी होतील, असे म्हटले जात आहे.  (west bengal assembly election 2021 sourav ganguly may start political innings in pm narendra modi rally) 

पंतप्रधाननरेंद्र मोदी पश्चिम बंगाल दौऱ्यावर असून, ०७ मार्च रोजी ते एका सभेला संबोधित करणार आहेत. सौरव गांगुली पंतप्रधान मोदींच्या रॅलीत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सौरव गांगुली भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या वृत्ताला सौरव गांगुली आणि भाजपकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. 

उच्चशिक्षित ममता दीदींकडे नेमकी संपत्ती किती? 'इतके' आहे सोने; पाहा

सौरव गांगुलींवर निर्णय

सौरव गांगुली आताच्या घडीला निवासस्थानी आराम करत आहेत, याची आम्हाला कल्पना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीत सहभागी होण्याचा निर्णय हा सर्वस्वी सौरव गांगुली यांच्यावर अवलंबून आहे. सौरव गांगुली यांची प्रकृती आणि स्वास्थ्य उत्तम असेल, तर ते यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात. सौरव गांगुलींकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास त्यांचे स्वागतच आहे, असे मत भाजप प्रवक्ते शामिक भट्टाचार्य यांनी व्यक्त केले आहे. 

दरम्यान, अलीकडेच सौरव गांगुली यांच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली आहे. ३१ जानेवारी रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला सौरव गांगुली यांचा हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांची अँजियोप्लास्टी करण्यात आली होती. मात्र, त्रास जाणवू लागल्याने सौरव गांगुली यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाSaurav Gangulyसौरभ गांगुलीprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी