बंगालमध्ये आता शिव विरुद्ध राम!; ममता दीदी महाशिवरात्रीच्या दिवशी निवडणूक अर्ज भरणार

By देवेश फडके | Published: March 4, 2021 02:35 PM2021-03-04T14:35:11+5:302021-03-04T14:36:43+5:30

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर (West Bengal Assembly Election 2021) आता पुढील टप्प्यात निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यात मतदान होणार असून, राजकीय रणधुमाळी अधिक आक्रमक होताना दिसत आहे. यातच आता पश्चिम बंगालमध्ये महादेव शिवशंकर विरुद्ध श्रीराम असे चित्र पाहायला मिळू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण महाशिवरात्रीच्या दिवशी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) निवडणूक अर्ज दाखल करतील, असे म्हटले जात आहे.

west bengal assembly election 2021 mamata banerjee will file nomination on mahashivratri | बंगालमध्ये आता शिव विरुद्ध राम!; ममता दीदी महाशिवरात्रीच्या दिवशी निवडणूक अर्ज भरणार

बंगालमध्ये आता शिव विरुद्ध राम!; ममता दीदी महाशिवरात्रीच्या दिवशी निवडणूक अर्ज भरणार

Next
ठळक मुद्दे११ मार्च रोजी ममता बॅनर्जी विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकणारनिवडणूक अर्ज दाखल करण्याची तयारी सुरूमहाशिवरात्रीचा दिवस निवडण्यामागे खास कारण

कोलकाता : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर (West Bengal Assembly Election 2021) आता पुढील टप्प्यात निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यात मतदान होणार असून, राजकीय रणधुमाळी अधिक आक्रमक होताना दिसत आहे. यातच आता पश्चिम बंगालमध्ये महादेव शिवशंकर विरुद्ध श्रीराम असे चित्र पाहायला मिळू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण महाशिवरात्रीच्या दिवशी ममता बॅनर्जी निवडणूक अर्ज दाखल करतील, असे म्हटले जात आहे. (west bengal assembly election 2021 mamta banerjee will file nomination on mahashivratri)

पश्चिम बंगालच्या मुख्यंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा असलेल्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) ११ मार्च रोजी नंदीग्राम येथून अर्ज दाखल करून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचे सांगितले जात आहे. याच दिवशी महाशिवरात्रीचे महापर्व आहे. जय श्रीराम किंवा जय सीयाराम या घोषणांवरून भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार वादावादी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस रामद्रोही असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. मात्र, हा भाजपचा हा निवडणूक स्टंट आहेत, असा पलटवार तृणमूलकडून करण्यात येत आहे. 

 

योगी आदित्यनाथ म्हणाले, 'हा नव्या भारताचा नवा उत्तर प्रदेश; आम्ही पुन्हा सत्तेत येऊ अन्...'

निवडणूक अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ११ मार्च रोजी नंदीग्राम येथून निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. नंदीग्राम येथे तात्पुरत्या निवासस्थानाची सोय करण्यात आली आहे. १० मार्च रोजी ममता बॅनर्जी मिदनापूर येथील हल्दिया येथे जाणार आहेत. येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक आटोपल्यानंतर ममता बॅनर्जी नंदीग्राम येथे जाणार आहेत.

महाशिवरात्रीचा दिवस का निवडला?

ममता बॅनर्जी यांनी महाशिवरात्रीचा दिवस निवडण्यामागे खास कारण असल्याचे सांगितले जात आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी निवडणूक अर्ज दाखल करून आपण शिवभक्त असून, हिंदुंचा पवित्र सण जीवनातील महत्त्वाचे काम करण्यासाठी निवडला आहे. कारण हिंदू बांधव जीवनातील महत्त्वाचे काम पवित्र, शुभ दिनी करतो, असा संदेश ममता बॅनर्जी यांना बंगालच्या जनतेला द्यायचा आहे, असे सांगितले जात आहे. 

Web Title: west bengal assembly election 2021 mamata banerjee will file nomination on mahashivratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.