ममता बॅनर्जींना मोठा धक्का! ५ आमदारांचा तृणमूल काँग्रेसला रामराम; भाजपमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 12:14 PM2021-03-09T12:14:02+5:302021-03-09T12:16:34+5:30

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक (West Bengal Assembly Election 2021) जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने (BJP) आपली ताकद पणाला लावली आहे.

west bengal assembly election 2021 five trinamool congress mla join bjp | ममता बॅनर्जींना मोठा धक्का! ५ आमदारांचा तृणमूल काँग्रेसला रामराम; भाजपमध्ये प्रवेश

ममता बॅनर्जींना मोठा धक्का! ५ आमदारांचा तृणमूल काँग्रेसला रामराम; भाजपमध्ये प्रवेश

Next
ठळक मुद्देममता बॅनर्जींना मोठा धक्कापाच आमदारांचा भाजपमध्ये प्रवेशविधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी नाकारल्याने निर्णय

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक (West Bengal Assembly Election 2021) जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने (BJP) आपली ताकद पणाला लावली आहे. ओपिनियन पोलमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांचे सरकार येणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, राजकीय रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या पाच आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. (west bengal assembly election 2021 five trinamool congress mla join bjp)

मिळालेल्या माहितीनुसार, राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निकटच्या सहकारी आणि चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या सोनाली गुहा आणि रवींद्रनाथ भट्टाचार्य यांना तृणमूल काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले जतू लाहिरी आणि माजी फुटबॉलपटू दीपेन्दू विश्वास यांनाही तृणमूल काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शीतल सरदार या तृणमूल काँग्रेस आमदारानेही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

धक्कादायक! गेल्या १० महिन्यांत १० हजार कंपन्या बंद; महाराष्ट्रातील आकडा किती? वाचा

जिल्हा परिषद भाजपच्या नियंत्रणाखाली

मालदा जिल्हा परिषदेतील २२ सदस्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने ३८ सदस्य असलेली ही जिल्हा परिषद भाजपच्या नियंत्रणाखाली आली आहे. दुसरीकडे बंगाली अभिनेत्री तनुश्री चक्रवर्ती यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी तृणमूल काँग्रेस सरकारविरुद्ध अपप्रचार करून अफवा पसरवत असल्याबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी मोदींना फटकारले. एक दिवस देशाला नरेंद्र मोदी यांचे नाव दिले जाईल आणि तो दिवसही दूर नाही, असा निशाणाही ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर साधला.

दरम्यान, पश्चिम बंगालमधील २९४ जागांसाठी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून, आठ टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. आठही टप्प्यांचे मतदान पूर्ण झाल्यावर २ मे रोजी मतमोजणी होईल. ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या २९१ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये ५० महिलांना तिकीट देण्यात आले आहे. 

Web Title: west bengal assembly election 2021 five trinamool congress mla join bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.