शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

West Bengal Election 2021: आम्ही जानवंही घालत नाही, काय करायचं?; ओवेसी यांचा ममता दीदींवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 18:39 IST

west bengal assembly election 2021: एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे.

ठळक मुद्देओवेसी यांची ममता बॅनर्जी यांच्यावर टीकानिवडणुकीत हिंदू कार्ड खेळत असल्याबाबत व्यक्त केली नाराजीट्विटरच्या माध्यमातून ममता दीदींवर निशाणा

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (west bengal assembly election 2021) पहिल्या टप्प्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला वेग आला आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. ममता बॅनर्जी यांनी हिंदू कार्ड खेळले असून, आपण ब्राह्मणाची मुलगी असल्याचे सांगितले. तर, काल झालेल्या एका सभेत बोलताना आपले गोत्र शांडिल्य असल्याचे म्हटले. यावरून एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. आम्ही जानवंही घालत नाही, आमच्यासारख्यांनी काय करायचं, अशी विचारणा केली आहे. (asaduddin owaisi replied mamata banerjee)

अलीकडेच झालेल्या एका प्रचारसभेत मी हिंदू ब्राह्मणाची मुलगी आहे. मला हिंदू धर्म शिकवायला जाऊ नका, असे सांगत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. त्यांनतर माझे गोत्र शांडिल्य असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. यावरून असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. एक ट्विट करत ओवेसी यांनी ममता दीदींवर निशाणा साधला आहे. 

आमच्यासारख्यांनी नेमकं काय करायचं

आमच्यासारख्या लोकांना काय करायचं. आमचं गोत्र शांडिल्य नाही, जानवं घालत नाही, अमूक एका देवाचे भक्तही नाही, चालीसा पठण करत नाही की, त्या मार्गावर जात नाही. जिंकण्यासाठी हिंदू कार्ड वापरायला हवे, असे प्रत्येक पक्षाला वाटते. हे अनैतिक, अपमानजनक आणि अयशस्वी होणारे आहे, असे ट्विट असदुद्दीने ओवेसी यांनी केले आहे. 

“नरेंद्र मोदी दिवसाचे २४ तास खोटं बोलतात, केव्हाही टीव्ही ऑन करा आणि बघा”

काय म्हणाल्या होत्या ममता बॅनर्जी?

नंदीग्राम येथील एका जनसभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी एक आठवणीतील किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या की, एका मंदिरात पूजनासाठी गेले होते. तेव्हा मला माझे गोत्र विचारण्यात आले. मागे एकदा त्रिपुरेश्वरी मंदिरात मी माझे गोत्र मां, माटी आणि मनुष्य असल्याचे सांगितले होते. मात्र, आता मला विचारल्यावर मी सांगितले की, माझे वैयक्तिक गोत्र शांडिल्य आहे. 

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह एम. के. स्टॅलिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, हेमंत सोरेन, अरविंद केजरीवाल, नवीन पटनायक, जगन रेड्डी, के. एस. रेड्डी, फारूक अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती आणि दीपांकर भट्टाचार्य यांनी पत्र लिहून भाजपविरोधात पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीPoliticsराजकारणTrinamool Congressतृणमूल काँग्रेस