कुही..... सिंगल
By Admin | Updated: February 10, 2015 00:56 IST2015-02-10T00:56:27+5:302015-02-10T00:56:27+5:30
शाळा व्यवस्थापन समितीचे प्रशिक्षण

कुही..... सिंगल
श ळा व्यवस्थापन समितीचे प्रशिक्षणकुही : शाळा व्यवस्थापन समितीचे कार्य अधिक पारदर्शी व्हावे यासाठी केंद्र शाळा कुही अंतर्गत असलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक व कार्यकारिणीचे एक दिवसीय प्रशिक्षण नुकतेच पार पडले. सभेच्या अध्यक्षस्थानी कमलाकर भोयर होते. याप्रसंगी दिनेश लांजेवार, माधव रघटाटे, विजय ठाकरे, नरेंद्र कांबळे, भालचंद्र गांगलवार आदी उपस्थित होते. केंद्रप्रमुख नलिनी चोपडे यांनी प्रास्ताविक केले. तज्ज्ञ मार्गदर्शक अविनाश सवाई, खेमराज मोवाडे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. यात शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका, रचना, कार्य व योगदान याविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. संचालन मारोती खोबरकर यांनी तर आभार श्रद्धा इंगळकर यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)