जामिनावर सुटलेल्या जयललितांचे चेन्नईमध्ये उत्साहात स्वागत
By Admin | Updated: October 18, 2014 18:20 IST2014-10-18T18:20:00+5:302014-10-18T18:20:00+5:30
ऑल इंडिया अण्णा द्रमुकच्या प्रमुख आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता या शनिवारी जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्या आहेत.

जामिनावर सुटलेल्या जयललितांचे चेन्नईमध्ये उत्साहात स्वागत
>ऑनलाइन टीम
बंगळुर, दि. १८ - ऑल इंडिया अण्णा द्रमुकच्या प्रमुख आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता या शनिवारी जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्या आहेत. त्या चेन्नईला रवाना झाल्या असून हजारोंच्या संख्येने त्यांचे पाठिराखे जल्लोषात रस्त्यावर उतरले आहेत. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी वीस दिवसांपूर्वी दोषी आढळलेल्या जयललिता बंगळुरू येथील सेंट्रल जेलमध्ये होत्या. अठरा वर्षांपूर्वीच्या या खटल्यामध्ये दोषी आढळल्यानंतर जयललितांच्या पाठिराख्यांना हा धक्का सहन झाला नाही, जवळपास पाचजणांनी आत्महत्या केल्या तर काही जण ह्रदयविकाराने मरण पावले. जयललिता यांनी आपण निर्दोष असल्याचे सांगत वरच्या न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला तसेच जामिनासाठी अर्ज केला. परंतु २० दिवसा त्यांना जामिन नाकारण्यात आला.
अखेर शुक्रवारी त्यांना जामिन मंजूर करण्यात आला असून शनिवारी त्या कारागृहातून बाहेर आल्या आहेत. दोषी आढळल्यावर लगेच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा त्यांनी दिल्यानंतर पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. जयललिता यांचे चेन्नईमध्ये प्रचंड जल्लोषात स्वागत करण्यात आले असून त्यांचे कार्यकर्ते दिवाळीपूर्वीची दिवाळी साजरी करत आहेत.