शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

PM मोदींचं काशीत जल्लोषात स्वागत, पुष्पवृष्टी अन् 'हर हर महादेव'चा जयघोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 13:05 IST

वाराणसीच्या गल्ली-बोळातून मोदी कालभैरव मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. यावेळी, लोकांनी जल्लोषात मोदींचे स्वागत केले, मोदींच्या नावाचा जयघोष करत त्यांच्या गाडीवर पुष्पवृष्टीही करण्यात आली.

वाराणसी - पंतप्रधाननरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर असून काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे (Kashi Vishwanath Corridor) उद्घाटन केल्यानंतर त्यांची रिव्हर क्रूझवर काही मुख्यमंत्र्यांसोबत अनौपचारिक बैठक होणार आहे. तत्पूर्वी काशीतील कालभैरव मंदिरात जाऊन मोदींनी दर्शन घेऊन आरती केली. त्यानंतर, गंगा मार्गकडे प्रस्थान करुन ललिता घाट येथे गंगा नदीत मोदींनी डुबकी घेतली. 

वाराणसीच्या गल्ली-बोळातून मोदी कालभैरव मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. यावेळी, लोकांनी जल्लोषात मोदींचे स्वागत केले, मोदींच्या नावाचा जयघोष करत त्यांच्या गाडीवर पुष्पवृष्टीही करण्यात आली. मोदी मोदी आणि हर हर महादेव या घोषणांनी वाराणसीच्या गल्ली बोळात आसमंत दणाणून गेल्याचं पाहायला मिळालं. मोदींच्या गाडीवर करण्यात आलेल्या पुष्पवृष्टीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.  वाराणसीतील मोठ्या कॉरिडॉरची पायाभरणी मोदींनी 8 मार्च 2019 रोजी केली होती, जी मुख्य मंदिराला ललिता घाटाशी जोडते आणि चारही दिशांना भव्य दरवाजे आणि सजावटीचे तोरण दरवाजे बांधले आहेत. "पंतप्रधान मोदी घाटातून काशी विश्वनाथ धामला पोहोचतील आणि त्यानंतर कॉरिडॉरचे उद्घाटन करतील. ते नवीन कॉरिडॉरच्या परिसराची आणि इमारतींची पाहणी करतील. तसेच, देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने साधूंच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. यासाठी बरेच साधू आले आहेत."

मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

दरम्यान, आज "संध्याकाळी नदीच्या समुद्रपर्यटनावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधानांची अनौपचारिक बैठक होईल. वाराणसीचे खासदार असल्याने त्यांनी नदीच्या काठावर वसलेल्या काशीची भव्यता मुख्यमंत्र्यांना दाखवण्याची इच्छा व्यक्त केली होती. रिव्हर क्रूझवरून पंतप्रधान गंगा आरती पाहतील आणि घाटांवर भव्य उत्सवाचा आनंद लुटतील. फटाक्यांची आतषबाजी आणि लेझर शोही होणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीVaranasiवाराणसीprime ministerपंतप्रधान