शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

राइट टू प्रायव्हसीवरील निर्णयाचं राहुल गांधींकडून स्वागत; भाजपावर केली जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 15:48 IST

राइट टू प्रायव्हसीवर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी स्वागत केलं आहे.

ठळक मुद्दे राइट टू प्रायव्हसीवर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी स्वागत केलं आहे. कोर्टाच्या निकालाने फॅसिस्ट शक्तींना चांगलीच चपराक बसली आहे, असं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षपणे टीका केली.सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे फॅसिस्ट शक्तींना आणि विचारांना चपराक बसली आहे.

मुंबई, दि. 24- राइट टू प्रायव्हसीवर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी स्वागत केलं आहे. कोर्टाच्या निकालाने फॅसिस्ट शक्तींना चांगलीच चपराक बसली आहे, असं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षपणे टीका केली. राइट टू प्रायव्हसी हा मूलभूत अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. कोर्टाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे अनेक योजनांसाठी आधार कार्डची सक्ती करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसणार आहे.

‘व्यक्तिगत गोपनीयता हा मूलभूत अधिकार असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. कोर्टाच्या या निर्णयाचं स्वागत आहे. व्यक्तिगत गोपनीयता नागरिकांच्या स्वातंत्र्याचा महत्त्वाचा भाग आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे फॅसिस्ट शक्तींना आणि विचारांना चपराक बसली आहे. नागरिकांवर पाळत ठेवून दडपशाही करण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना हा जोरदार धक्का आहे,’ असं ट्विट करत राहुल गांधींनी कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करत भाजपावर टीका केलीये.

याआधीही काँग्रेसने केंद्र सरकारकडून करण्यात येत असलेल्या आधार कार्डच्या सक्तीवर टीका केली होती. ‘काँग्रेस सरकारने आधार कार्डचा वापर करताना व्यक्तिगत गोपनीयतेला धक्का लावला नव्हता. आधारच्या संकल्पनेत कोणताही दोष नाही. मात्र भाजाप सरकारकडून चुकीच्या पद्धतीने आधार कार्डची सक्ती केली जात आहे,’ अशा शब्दांमध्ये काँग्रेसकडून भाजपवर टीका केली होती.

'राइट टू प्रायव्हसी'संदर्भात सुप्रीम कोर्टाचा निर्णय

राइट टू प्रायव्हसी संदर्भात सुप्रीम कोर्टाने आज ऐतिहासिक निर्णय दिला आहे.  राइट टू प्रायव्हसी हा मुलभूत अधिकार आहे, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.नऊ सदस्यांच्या घटनापीठाने एकमताने व्यक्तिगत गोपनीयता हा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट केलं.सुप्रीम कोर्टातील 9 सदस्यांच्या घटनापीठाने आज व्यक्तिगत गोपनियता मुलभूत अधिकार (Right to privacy) आहे की नाही याबाबत निर्णय दिला आहे .राज्यघटनेतील कलम २१ नुसार व्यक्तिगत गोपनीयता हा जगण्याचा मूलभूत अधिकार असल्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितलं.सुप्रीम कोर्टाच्या निकालाने आधार सक्तीच्या निर्णयावर मोठा परिणाम होईल असं बोललं जातं आहे. आधार सक्तीमुळे व्यक्तिगत गोपनीयतेच्या मूलभूत अधिकारांचा भंग होतो असा दावा करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली होती. या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी