दिमाखदार विजय रॅलीने मोदींचे दिल्लीत स्वागत
By Admin | Updated: May 17, 2014 12:40 IST2014-05-17T12:16:26+5:302014-05-17T12:40:55+5:30
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर नरेंद्र मोदी दिल्लीत दाखल झाले असून भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले.

दिमाखदार विजय रॅलीने मोदींचे दिल्लीत स्वागत
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १७ - लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर नरेंद्र मोदी दिल्लीत दाखल झाले असून भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले. विमानतळावर कार्यकर्त्यांनी भाजपाचे झेंडे फडकावत, मोदींच्या नावच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. विमानतळापासून ते भाजपच्या मुख्य कार्यालयापर्यंत हजारो कार्यकर्त्यांच्या गराड्यात मोदींच्या गाड्यांचा ताफा निघाला. चहुबाजूंनी मोदींवर पुष्पवृष्टी करत, फटाके फोडत भाजपाची विजय रॅली पुढे सरकत होती.
यावेळी मोदींनी दिल्लीतील मतदारांचे तसेच भाजपा कार्यकर्त्याचे अभिनंदन केले. भाजप उमेदवारांना निवडून आणल्याबद्दल तसेच भाजप सरकावर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांनी सर्वाचे आभार मानले. हा विजय आमचा नसून देशातील सव्वाशे कोटी जनतेचा असल्याचेही मोदी म्हणाले. यावेळी भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांसह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
थोड्याच वेळात भाजपच्या संसदीय समितीची बैठक पार पडणार असून मंत्रिमंडळाच्या निवजीसह अनेक महत्वपूर्ण विषयांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते.