सपकाळ फार्मसीमध्ये स्वागत सभारंभ

By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:40+5:302015-09-07T23:27:40+5:30

नाशिक : कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट सपकाळ नॉलेज हब संचलित आर. जी. सपकाळ कॉलेज ऑफ फार्मसी, अंजनेरी या महाविद्यालयातील पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या नवीन विद्यार्थ्यांच्या स्वागत सभारंभाचे आयोजन करण्यात आले.

Welcome ceremonies in the dream pharmacy | सपकाळ फार्मसीमध्ये स्वागत सभारंभ

सपकाळ फार्मसीमध्ये स्वागत सभारंभ

शिक : कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट सपकाळ नॉलेज हब संचलित आर. जी. सपकाळ कॉलेज ऑफ फार्मसी, अंजनेरी या महाविद्यालयातील पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या नवीन विद्यार्थ्यांच्या स्वागत सभारंभाचे आयोजन करण्यात आले.
अध्यक्ष रवींद्र सपकाळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या प्रसंगी या संस्थेत विद्यार्थ्यांनी यशस्वी वाटचाल करून आदर्श जीवन घडवावे व यासाठी संस्था सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या ओळख कार्यक्रमाबरोबरच विद्यार्थी गुणदर्शनाचा कार्यक्रमही झाला. नवीन विद्यार्थ्यांमधून मिस फ्रेशर व मिस्टर फ्रेशर निवडण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. आर. बी. सौदागर यांनी महाविद्यालयात चालणार्‍या विविध घडामोडी व शिस्त यावर प्रकाश टाकला.
महाविद्यालयाचे अकॅडमीक डिन डॉ. आर. एस. बच्छाव यांनी फार्मसी अभ्यासक्रमाच्या चार वर्षात विद्यार्थ्यांनी आतापासून नियोजनबद्ध असावे याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष कल्याणी सपकाळ कॅम्पस संचालक, प्रा. ए. के. मन्सुरी, डॉ. एस. बी. धांडे, संचालक के. आर. सपकाळ कॉलेज ऑफ मॅनेजमेट स्टडीज् डॉ. व्ही. जे. गोंड, प्राचार्य, लेट जी. एन. सपकाळ कॉलेज ऑफ इंजिनिरींग , प्रा. एस. बी. गोंदकर व डॉ. ए. बी. दरेकर आदि मान्यवर उपस्थित होते.


आर. जी. सपकाळ औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात प्रथम व व्दितीय वर्ष बी. फार्मसी तसेच एम. फार्मसी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष श्री. रवींद्र गंभीरराव सपकाळ, उपाध्यक्षा सौ. कल्याणी सपकाळ व आदि.

Web Title: Welcome ceremonies in the dream pharmacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.