महाराष्ट्राच्या विकासासाठी काँग्रेस वगळता सर्व पक्षांचे स्वागत - रुडी
By Admin | Updated: November 11, 2014 18:52 IST2014-11-11T18:34:43+5:302014-11-11T18:52:09+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला पाठिंबा जाहीर केला असतानाच महाराष्ट्राच्या विकासासाठी काँग्रेसवगळता अन्य कोणत्याही पक्षाने पाठिंबा दिल्यास आम्ही त्याचे स्वागतच करु
_ns.jpg)
महाराष्ट्राच्या विकासासाठी काँग्रेस वगळता सर्व पक्षांचे स्वागत - रुडी
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला पाठिंबा जाहीर केला असतानाच महाराष्ट्राच्या विकासासाठी काँग्रेसवगळता अन्य कोणत्याही पक्षाने पाठिंबा दिल्यास आम्ही त्याचे स्वागतच करु असे सूचक विधान भाजपा नेते राजीव प्रताप रुडी यांनी केले आहे. या विधानातून रुडी यांनी भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेण्यास तयार असल्याचे संकेतच दिले आहे.
महाराष्ट्र विधानसभेत उद्या फडणवीस सरकारला विश्वास दर्शक ठरावाला सामोरे जायचे आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे प्रभारी राजीव प्रताप रुडी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यात रुडी म्हणाले, महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि जनतेच्या आशा - अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जो पक्ष आमच्यासोबत यायला तयार आहे त्यांचे आम्ही स्वागतच करु. शिवसेना पुन्हा आमच्यासोबत येईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्याविषयी त्यांनी थेट भाष्य करणे टाळले. राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिल्याचे रुडी यांनी सांगितले.
शिवसेनेने भाजपाला पाठिंबा देण्याविषयी ठोस भूमिका जाहीर केलेली नसतानाच रुडी यांनी या विधानाद्वारे शिवसेनेला सूचक इशारा दिल्याची चर्चा रंगली आहे.